Kolkata Rape-Murder Case : आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,

पश्चिम बंगालमधील कोलकाता रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घृणास्पद घटनेतील आरोपींची पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

कोलकाता येथील एमजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा विनयभंग करून तिची हत्या करण्यात आली. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून, विनयभंग आणि हत्येचा आरोपी संजय रॉयची मानसिक चाचणी केल्यानंतर आता त्याची पॉलीग्राफ चाचणी केली जाणार आहे. 

तसेच हा आरोपी काहीतरी लपवत असल्याचा संशय सीबीआयला असून तो पॉलीग्राफ टेस्टमध्ये सत्य उघड करेल. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल दिल्लीत पोहोचले असून ते गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source