नियुक्ती पत्र न दिल्यास सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडणार
वेंगुर्ले तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत सहभागी परीक्षार्थींचा प्रांताधिकाऱ्यांना इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी
पोलीस पाटील पद प्रक्रिया 2023 चा अंतिम निकाल जाहीर करून निवड झालेल्या वेंगुर्ले तालुक्यातील उमेदवारांना गुरुवारी १ ऑगस्टपर्यंत तात्काळ नियुक्ती न दिल्यास सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा वेंगुर्ले तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या परीक्षार्थींनी सावंतवाडी प्रांत अधिकारी हेमंत निकम यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत प्रांतांना दिलेल्या निवेदनानुसार शासनाकडून पोलीस पाटील भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी लेखी परीक्षा ७ जानेवारी 2024 रोजी तर तोंडी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. लेखी परीक्षेचे गुण जाहीर करण्यात आले. परंतु,चार महिने उलटूनही अद्याप अंतिम यादी जाहीर करण्यात आली नसल्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान जिल्ह्यातील दोन तालुक्यातील पोलीस पाटील भरतीतील निकालाची अंतिम यादी जाहीर करून नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र वेंगुर्ले., दोडामार्ग ,सावंतवाडी तालुक्याची यादी जाहीर करण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने अंतिम यादी जाहीर करून पात्र उमेदवारांना गुरुवार १ ऑगस्टपर्यंत तात्काळ नियुक्ती पत्र न दिल्यास सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा वेंगुर्ले तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या परीक्षार्थींनी सावंतवाडी प्रांत अधिकारी हेमंत निकम यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
Home महत्वाची बातमी नियुक्ती पत्र न दिल्यास सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडणार
नियुक्ती पत्र न दिल्यास सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडणार
वेंगुर्ले तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत सहभागी परीक्षार्थींचा प्रांताधिकाऱ्यांना इशारा सावंतवाडी । प्रतिनिधी पोलीस पाटील पद प्रक्रिया 2023 चा अंतिम निकाल जाहीर करून निवड झालेल्या वेंगुर्ले तालुक्यातील उमेदवारांना गुरुवारी १ ऑगस्टपर्यंत तात्काळ नियुक्ती न दिल्यास सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा वेंगुर्ले तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या परीक्षार्थींनी सावंतवाडी प्रांत अधिकारी हेमंत निकम […]