तन्वी म्हाडगुतचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

बारावी परीक्षेत जिल्ह्यात आली होती प्रथम कट्टा / वार्ताहर दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 2024 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत बारावी परीक्षेत आपली यशाची परंपरा कायम ठेवली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बारावी परीक्षेत 97.00 % एवढे गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविलेल्या मालवण तालुक्यातील कट्टा गावची कन्या आणि डॉन बॉस्को स्कूलची विद्यार्थिनी कुमारी तन्वी केदार म्हाडगुत हिचा […]

तन्वी म्हाडगुतचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

बारावी परीक्षेत जिल्ह्यात आली होती प्रथम
कट्टा / वार्ताहर
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 2024 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत बारावी परीक्षेत आपली यशाची परंपरा कायम ठेवली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बारावी परीक्षेत 97.00 % एवढे गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविलेल्या मालवण तालुक्यातील कट्टा गावची कन्या आणि डॉन बॉस्को स्कूलची विद्यार्थिनी कुमारी तन्वी केदार म्हाडगुत हिचा मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी तिच्या कट्टा येथील निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व तिचे अभिनंदन केले. यावेळी तिची आई शीतल केदार म्हाडगुत, बहीण तनिषा म्हाडगुत, दर्शन म्हाडगुत, वंदेश ढोलम, शेखर रेवडेकर, बाबू टेंबुलकर, राजू गावडे उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.