पंतप्रधान मोदींविरोधात कारवाई करा

जयराम रमेश यांचे उपराष्ट्रपतींना पत्र वृत्तसंस्था/ नवी दिल्ली काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांच्याविरोधात कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध विशेषाधिकार भंगाची कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. आज जेव्हा नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:च्या खालावणाऱ्या प्रतिमेला […]

पंतप्रधान मोदींविरोधात कारवाई करा

जयराम रमेश यांचे उपराष्ट्रपतींना पत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांच्याविरोधात कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध विशेषाधिकार भंगाची कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.
आज जेव्हा नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:च्या खालावणाऱ्या प्रतिमेला उंची मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा मी राज्यसभा सभापतींना पत्र लिहून हमीद अंसारींसंबंधी अपमानास्पद वक्तव्यासाठी विशेषाधिकार भंगाची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 जुलै रोजी लोकसभेत अंसारी यांना उद्देशून अपमानास्पद टिप्पणी केली होती असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे.
आतापर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी माजी लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभेचे माजी सभापती विरोधात अशाप्रकारचे वक्तव्य केले नव्हते असे जयराम रमेश यांनी स्वत:च्या पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविला आहे तसेच त्यांनी संसदीय मर्यादा आणि नियमांचाही भंग केला आहे. या अपमानास्पद टिप्पणीसाठी  पंतप्रधानांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची कार्यवाही सुरू करण्यात यावी असे जयराम रमेश यांनी उपराष्ट्रपती धनखड यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी काय म्हटले होते?
पंतप्रधान मोदीनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना केलेल्या टिप्पणीचा उल्लेख जयराम रमेश यांनी केला आहे. विरोधी पक्षांनी कितीही संख्येचा दावा करावा. जेव्हा आम्ही 2014 मध्ये सत्तेवर आलो होतो, तेव्हा राज्यसभेत आमची शक्ती खूपच कमी होत आणि (तत्कालीन) सभापतीचा कल काही प्रमाणात दुसऱ्या बाजूने होता, तरीही आम्ही गर्वासोबत देशाची सेवा करण्याच्या स्वत:च्या संकल्पापासून डगमगलो नाही. देशाच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याचा आदेश दिला आहे. अशा स्थितीत कुठल्याही अडथळ्यामुळे मोदी घाबरणार नाही आणि हे सरकार घाबरणार नाही. आम्ही केलेले संकल्प पूर्ण करूच असे मोदींनी म्हटले होते. मोदींनी या भाषणात कुणाचा नामोल्लेख केला नव्हता, परंतु उपराष्ट्रपती अंसारी हे ऑगस्ट 2012 पासून ऑगस्ट 2017 पर्यंत राज्यसभेचे सभापती होते.