रोटरी क्लब इलाईटचा अधिकारग्रहण सोहळा

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटच्या 2024-25 च्या नवीन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण सोहळा दि. 27 जून रोजी बेळगाव फाऊंड्री क्लस्टरच्या सभागृहात पार पडला. माजी जिल्हा गव्हर्नर डॉ. समीर हरियाणी यांच्या हस्ते हा अधिकारग्रहण सोहळा पार पडला. यावेळी सचिन हंगिरगेकर यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सचिव विशाल मुरकुंबी व कोषाध्यक्ष रवी संगोळ्ळी यांनाही सूत्रे देण्यात आली. […]

रोटरी क्लब इलाईटचा अधिकारग्रहण सोहळा

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटच्या 2024-25 च्या नवीन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण सोहळा दि. 27 जून रोजी बेळगाव फाऊंड्री क्लस्टरच्या सभागृहात पार पडला. माजी जिल्हा गव्हर्नर डॉ. समीर हरियाणी यांच्या हस्ते हा अधिकारग्रहण सोहळा पार पडला. यावेळी सचिन हंगिरगेकर यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सचिव विशाल मुरकुंबी व कोषाध्यक्ष रवी संगोळ्ळी यांनाही सूत्रे देण्यात आली. प्रारंभी मावळते अध्यक्ष जयकुमार पाटील आणि सचिव आदर्श मत्तीकोप यांनी 2023-24 मध्ये क्लबने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यावर्षीचा सर्वोत्तम रोटेरियन म्हणून संजीव भोसगी यांना पुरस्कार देण्यात आला.
क्लबच्या सामाजिक कार्याबद्दल समाधान
त्यानंतर नूतन अध्यक्षांनी 2024-25 मध्ये घेतला जाणारा कार्यक्रम आणि उपक्रमांचा तपशील सांगितला आणि नूतन कार्यकारी मंडळ आणि संचालकांची ओळख करून दिली. माजी प्रांतपाल समीर हरियाणी यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात क्लबने किमान 100 विविध कार्यक्रम आणि उपक्रम करण्याची सूचना नूतन अध्यक्षांना केली. तसेच क्लबच्या सध्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी सामाजिक कार्याचा भाग म्हणून बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या फीचा धनादेश शाळेच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच काही सुतारांना वूड कटरचे वितरण करण्यात आले. पुष्कर ओगले, कु. रमणी हंगिरगेकर यांनी सूत्रसंचालन केले. इव्हेंट चेअरमन आकाश पाटील यांनी आभार मानले.