बेळगाव-खानापुरातील मोटारसायकली चोरणाऱ्या तरुणाला अटक

बेळगाव-खानापुरातील मोटारसायकली चोरणाऱ्या तरुणाला अटक

कित्तूर पोलिसांकडून तीन मोटारसायकली जप्त
बेळगाव : बेळगावसह वेगवेगळ्या ठिकाणी मोटारसायकली चोरणाऱ्या एका तरुणाला कित्तूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. बसवराज रुद्राप्पा गु•ाकर, रा. गुरुवारपेठ, कित्तूर असे त्या तरुणाचे नाव आहे. कित्तूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी बसवराजला अटक केली आहे. खानापूर व बेळगाव येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळून आपण या मोटारसायकली चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. केए 22 ईटी 3865, केए 49 जे 9331, केए 24 क्यू 6680 या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. बसवराजने आणखी कोठे चोरी केली आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे. कित्तूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.