राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्वातीक पाटीलला सुवर्ण

सांबरा : ग्वालियर मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांगांच्या जलतरण स्पर्धेत मुतगे गावचा सुपुत्र व प्रयागराज येथील एनआयटी कॉलेजचा विद्यार्थी स्वातीक पाटीलने 3 सुवर्णपदके व एक कांस्यपदक पटकावून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेसाठी देशभरातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्वातीकच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. स्वातीक हा गेल्या अनेक वर्षापासून […]

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्वातीक पाटीलला सुवर्ण

सांबरा : ग्वालियर मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांगांच्या जलतरण स्पर्धेत मुतगे गावचा सुपुत्र व प्रयागराज येथील एनआयटी कॉलेजचा विद्यार्थी स्वातीक पाटीलने 3 सुवर्णपदके व एक कांस्यपदक पटकावून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेसाठी देशभरातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्वातीकच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. स्वातीक हा गेल्या अनेक वर्षापासून बेळगाव येथील जेएनएमसीच्या सुवर्ण जलतरण तलाव येथे नियमित सराव करतो. तर सध्या तो बेंगळूर येथे सराव करीत असून त्याला प्रशिक्षक उमेश कलघटगी यांचे प्रोत्साहन लाभले आहे. मुतगे येथील नारायण पाटील यांचा स्वातीक हा चिरंजीव होय.