सुशील कुमार मोदी अनंतात विलीन
शासकीय इतमामात पाटणा येथे अंत्यसंस्कार : भाजप अध्यक्षांनी घेतले अत्यंदर्शन
वृत्तसंस्था/ पाटणा
विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तत्पूर्वी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी सुशील मोदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले होते. व्रींय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, बिहार विधानसभेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर राय, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा यांच्यासमवेत अनेक नेते आणि हजारो समर्थकांनी सुशील मोदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
सुशील मोदींचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानानजीकच्या संघ कार्यालयात नेण्यात आले, तेथे अत्यंदर्शनासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तेथून पार्थिव भाजप कार्यालयात नेण्यात आले, त्यानंतर पाटण्यातील दीघाघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. या दु:खाच्या क्षणी मी सर्व शोकाकुल कुटुंबीय आणि समर्थकांप्रति स्वत:च्या संवेदना व्यक्त करतो असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.
सुशील कुमार मोदी यांच्यासोबत विद्यार्थी परिषदेपासून आतापर्यंत आम्ही एकत्रितपणे संघटनेसाठी काम केले. सुशील मोदी यांचे पूर्ण जीवन बिहारसाठी समर्पित राहिले. बिहारला जंगलराजमधून बाहेर काढत विकासाच्या मार्गावर नेण्यात सुशील मोदींचे मोठे योगदान हेते. त्यांच्या निधनामुळे असंख्य कार्यकर्त्यांची कधीच भरून न निघणारी हानी झाली असल्याचे उद्गार भाजप अध्यक्ष न•ा यांनी काढले आहेत.
कुशल राजकीय नेता गमाविला
खासदार सुशील कुमार मोदी यांच्या निधनामुळे मोठे दु:ख झाले. आम्हा सर्वांच्या भावना त्यांचे कुटुंब आणि असंख्य मित्र-चाहत्यांसोबत आहेत. संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक आणि अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री राहिलेले सुशील मोदी यांच्या निधनामुळे एक जागृत सामाजिक कार्यकर्ता आणि कुशल राजकीय नेता आम्ही गमाविला आहे. सामाजिक जीवनात तत्वनिष्ठा आणि पारदर्शकतेचे ते आदर्श उदाहरण होते. त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती दे आणि दिवंगत आत्म्याला सद्गती मिळावी अशी प्रार्थना ईश्वराकडे करत असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी सुशील कुमार मोदी अनंतात विलीन
सुशील कुमार मोदी अनंतात विलीन
शासकीय इतमामात पाटणा येथे अंत्यसंस्कार : भाजप अध्यक्षांनी घेतले अत्यंदर्शन वृत्तसंस्था/ पाटणा विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तत्पूर्वी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी सुशील मोदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले होते. व्रींय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय […]