उन्हाळी ड्रिंक : उन्हाळ्यासाठी खास गुलाबाचे सरबत थंडावा देईल
उन्हाळा वाढत आहे अशा परिस्थितीत खास गुलाबाचे सरबत जे आपल्याला थंडावा देईल आणि उष्णता कमी करेल चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य-
गुलाबपाणी ,1 किलो साखर(चाशनी साठी),1 चमचा वेलची पूड, 1 चमचा काळीमिरपूड,पाणी, बर्फ.
कृती –
साखरेमध्ये एक ग्लास पाणी घालून त्याला मंद गॅस वर ठेवून चाशनी तयार करा.चाशनी एकतारी असावी. नंतर या मध्ये गुलाबपाणी घाला 4 -5 वेळा उकळी घेऊन गॅस बंद करा. या मध्ये वेलची पूड आणि काळीमिरपूड घालून मिसळा आणि थंड होण्यासाठी ठेवा.गुलाब सरबत तयार. हे सरबत थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून ठेवा आणि झाकण लावून ठेवा. जेव्हाही वापरायचे असेल तेव्हा एक ग्लास पाण्यात हे सरबत मिसळा आणि बर्फाचे खडे घालून प्यावे.
हे गुलाबाचे सरबत सेवन केल्याने शरीरात होणारी जळजळ,तहान नाहीशी होऊन शरीराला थंडावा मिळतो.
टीप: आपल्याला इच्छा असल्यास या मध्ये गुलाबाच्या ताज्या पाकळ्या वाटून मिसळू शकता. या मुळे या सरबताची चव देखील वाढेल.