भाग्यनगर येथे भटक्या कुत्र्याचा हल्ला

वृद्ध जखमी : मनपाने गांभीर्य घेण्याची गरज बेळगाव : कणबर्गी रोडवर कुत्र्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच भाग्यनगर येथे एका वृद्धावर कुत्र्याने हल्ला केला आहे. या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महानगरपालिकेला यापूर्वी अनेकवेळा कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचा […]

भाग्यनगर येथे भटक्या कुत्र्याचा हल्ला

वृद्ध जखमी : मनपाने गांभीर्य घेण्याची गरज
बेळगाव : कणबर्गी रोडवर कुत्र्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच भाग्यनगर येथे एका वृद्धावर कुत्र्याने हल्ला केला आहे. या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महानगरपालिकेला यापूर्वी अनेकवेळा कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाग्यनगर येथील सातव्या क्रॉसजवळ ही घटना घडली आहे. वृद्ध चालत असताना अचानकपणे कुत्र्याने हल्ला केला. त्यांच्या पायाचा चावा घेतला आहे. आठ दिवसांपूर्वी लहान मुलांवरही या परिसरात कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेला निवेदनही देण्यात आले आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील जनतेतून होत आहे.