श्रीधर माळगीने नोंदविला एशियन विक्रम

जपानच्या कुबोटाकोटाचा विक्रम मोडला बेळगाव : जर्मनी येथील बर्लीन येथे घेण्यात आलेल्या आयडीएम बर्लीन विश्व पॅरा जलतरण स्पर्धेत भारताचा (बेळगाव) श्रीधर माळगीने 800 मीटर फ्रिस्टाईल स्पर्धेत गट 8 मध्ये नवीन एशियन विक्रम नोंदविला. बर्लीन येथे झालेल्या आयडीएम बर्लीन विश्व पॅरा जलतरण स्पर्धेत भारताचा श्रीधर माळगीने 800 मीटर फ्रिस्टाईल स्पर्धेत भाग घेऊन 10:48:85 इतक्या वेळेत पूर्ण करून नवीन एशियन […]

श्रीधर माळगीने नोंदविला एशियन विक्रम

जपानच्या कुबोटाकोटाचा विक्रम मोडला
बेळगाव : जर्मनी येथील बर्लीन येथे घेण्यात आलेल्या आयडीएम बर्लीन विश्व पॅरा जलतरण स्पर्धेत भारताचा (बेळगाव) श्रीधर माळगीने 800 मीटर फ्रिस्टाईल स्पर्धेत गट 8 मध्ये नवीन एशियन विक्रम नोंदविला. बर्लीन येथे झालेल्या आयडीएम बर्लीन विश्व पॅरा जलतरण स्पर्धेत भारताचा श्रीधर माळगीने 800 मीटर फ्रिस्टाईल स्पर्धेत भाग घेऊन 10:48:85 इतक्या वेळेत पूर्ण करून नवीन एशियन विक्रम नोंदविला आहे. यापूर्वी जपानच्या कुबोटाकोटाने 5 वर्षांपूर्वी 10:57:44 इतक्या वेळेत पूर्ण करून विक्रम नोंदविला होता. या विक्रम श्रीधरने मोडीत काढून नवीन विक्रम स्थापित केला आहे. या यशामुळे श्रीधरने बेळगावचे नाव जर्मनीपर्यंत उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.