दिवाळी, छठ पूजेच्या निमित्ताने विशेष गाड्या

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजेदरम्यान प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी भारतीय रेल्वेकडून 6,556 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने नागरिक दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठपूजेसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारला जातात. या उत्सवाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवासी एकत्र येतात. त्यामुळे रेल्वेची बहुतांश तिकिटे दोन ते तीन महिने आधीच प्रतीक्षा यादीत जातात. यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने यंदाच्या सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी, भारतीय रेल्वेने प्रवाशांना आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 4,429 उत्सव विशेष गाड्या चालवल्या. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेने यावर्षी 6,556 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 346 विशेष गाड्या चालवत आहे. अशा स्थितीत पश्चिम रेल्वेकडून 106 विशेष गाड्या (special train) चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्याहून दानापूर, गोरखपूर, बनारस, समस्तीपूर, प्रयागराज, हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या अशा अनेक गाड्या सुरू करणार आहेत. सणासुदीच्या काळात प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे (western railway) ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण 2,315 फेऱ्यांसह 106 विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ईशान्य भारतासाठी धावत आहेत. पश्चिम रेल्वे मुंबई (mumbai) ते देशाच्या विविध भागांमध्ये 14 गाड्या चालवते. त्याचप्रमाणे सुरत, उधना, वापी, वलसाड, वडोदरा, अहमदाबाद, साबरमती, हापा, ओखा, राजकोट, गुजरातमधील भावनगर टर्मिनल आणि मध्य प्रदेशातील इंदौर, डॉ. आंबेडकर नगर, उज्जैन येथूनही विशेष गाड्या धावणार आहेत.हेही वाचा बेकायदा होर्डिंगवर न्यायालयाचे कारवाईचे आदेश मुंबईतील के-पूर्व वॉर्डचे विभाजन

दिवाळी, छठ पूजेच्या निमित्ताने विशेष गाड्या

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजेदरम्यान प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी भारतीय रेल्वेकडून 6,556 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने नागरिक दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठपूजेसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारला जातात. या उत्सवाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवासी एकत्र येतात. त्यामुळे रेल्वेची बहुतांश तिकिटे दोन ते तीन महिने आधीच प्रतीक्षा यादीत जातात. यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने यंदाच्या सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या वर्षी, भारतीय रेल्वेने प्रवाशांना आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 4,429 उत्सव विशेष गाड्या चालवल्या. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेने यावर्षी 6,556 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 346 विशेष गाड्या चालवत आहे. अशा स्थितीत पश्चिम रेल्वेकडून 106 विशेष गाड्या (special train) चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्याहून दानापूर, गोरखपूर, बनारस, समस्तीपूर, प्रयागराज, हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या अशा अनेक गाड्या सुरू करणार आहेत.सणासुदीच्या काळात प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे (western railway) ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण 2,315 फेऱ्यांसह 106 विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ईशान्य भारतासाठी धावत आहेत. पश्चिम रेल्वे मुंबई (mumbai) ते देशाच्या विविध भागांमध्ये 14 गाड्या चालवते.त्याचप्रमाणे सुरत, उधना, वापी, वलसाड, वडोदरा, अहमदाबाद, साबरमती, हापा, ओखा, राजकोट, गुजरातमधील भावनगर टर्मिनल आणि मध्य प्रदेशातील इंदौर, डॉ. आंबेडकर नगर, उज्जैन येथूनही विशेष गाड्या धावणार आहेत.हेही वाचाबेकायदा होर्डिंगवर न्यायालयाचे कारवाईचे आदेशमुंबईतील के-पूर्व वॉर्डचे विभाजन

Go to Source