दक्षिण कोरिया – जॉर्डन लढत बरोबरीत

स्वयंगोलामुळे आणखी एका धक्कादायक निकाल टळला वृत्तसंस्था/ दोहा, कतार सोन ह्युंग-मिनच्या सुऊवातीच्या यशाच्या आधारे आघाडी मिळवूनही दक्षिण कोरियाला आशियाई चषक स्पर्धेतील जॉर्डनविरुद्धच्या सामन्यात 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले आणि तेही शेवटच्या क्षणी झालेल्या स्वयंगोलामुळे शक्य झाले. येथील अल थुमामा स्टेडियमवर याझान अल-अरबच्या हातून उशिरा झालेल्या स्वयंगोलामुळे दक्षिण कोरियाचा पराभव आणि इराकने जपानला 2-1 ने […]

दक्षिण कोरिया – जॉर्डन लढत बरोबरीत

स्वयंगोलामुळे आणखी एका धक्कादायक निकाल टळला
वृत्तसंस्था/ दोहा, कतार
सोन ह्युंग-मिनच्या सुऊवातीच्या यशाच्या आधारे आघाडी मिळवूनही दक्षिण कोरियाला आशियाई चषक स्पर्धेतील जॉर्डनविरुद्धच्या सामन्यात 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले आणि तेही शेवटच्या क्षणी झालेल्या स्वयंगोलामुळे शक्य झाले. येथील अल थुमामा स्टेडियमवर याझान अल-अरबच्या हातून उशिरा झालेल्या स्वयंगोलामुळे दक्षिण कोरियाचा पराभव आणि इराकने जपानला 2-1 ने पराभूत केल्यानंतर 24 तासांच्या अंतरात दुसरा धक्कादायक निकाल टळला.
या निकालामुळे अमेरिकेचे माजी प्रशिक्षक जर्गन क्लिन्समन यांच्या मार्गदर्शनाखालील क्षिण कोरिया आणि जॉर्डन या दोन्ही संघांचे ई गटातील पहिल्या दोन सामन्यांतून चार गुण झाले आहेत. पश्चिम जर्मनीच्या 1990 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिलेले क्लिन्समन दुसऱ्या सत्रात संघाकडून करण्यात आलेल्या प्रतिकारावर समाधानी दिसले.
दोन वेळा या स्पर्धेचा विजेता राहिलेल्या, पण 1960 नंतरच्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दक्षिण कोरियाची सुऊवात चांगली झाली. अवघ्या पाच मिनिटांनंतर एहसान हद्दादने सोनला गोलक्षेत्रात फाऊल केले. चार मिनिटांच्या ‘व्हीएआर’ तपासणीनंतर टॉटेनहॅमच्या या कर्णधाराने पेनल्टीवर गोल केला.  पण जॉर्डनने 37 व्या मिनिटात बरोबरी साधली. कारण पार्क योंग-वूने एका कॉर्नरवर स्वयंगोल केला.
पहिल्या सत्राचा स्टॉपेज टाईम पूर्ण होण्यास सहा मिनिटे असताना याझान अल-नैमतच्या गोलच्या जोरावर जॉर्डनने आघाडी घेतली. पण दुसऱ्या सत्राच्या स्टॉपेज टाईमच्या पहिल्याच मिनिटात दक्षिण कोरियाने टाकलेला दबाव कामी आला. सोनने ह्वांग इन-बीओमसाठी चेंडू मागे सरकवला आणि रेड स्टार बेलग्रेडच्या त्या मिडफिल्डरने हाणलेल्या फटक्यावर अल-अरबकडून स्वयंगोलाची नोंद झाली.
दुसरीकडे ई गटात बहरिनने मलेशियावर 1-0 अशी मात करत तीन गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. दुसऱ्या सत्राच्या स्टॉपेज टाईमच्या पाचव्या मिनिटाला अली मदानने सामन्यातील हा एकमेव गोल केला. सहा गटांतून आघाडीचे प्रत्येकी दोन संघ 16 संघांच्या बाद फेरीत प्रवेश करणार असून तिथे त्यांना चार सर्वोत्तम कामगिरी केलेले तिसऱ्या क्रमांकावरील संघ येऊन मिळणार आहेत.