Solapur : पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Solapur : पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

नवरा बायको मध्ये भांडण होतात पण हे विकोपाला जाणे घातक आहे. सोलापुरात पतीच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

सदर घटना सोलापूरच्या सांगोल्यात घडली असून पती आणि पत्नी दोघेही डॉक्टर आहे.महिलेने डॉक्टर पतीच्या शारीरिक मानसिक छळाला कंटाळून टोकाचे पाऊले घेत राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. या दांपत्याला दोन मुलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रेडिओलॉजिस्ट एमडी या डॉक्टर महिलेचे लग्न सुरज नावाच्या रेडिओलॉजिस्ट एमडी डॉक्टरशी 2012 मध्ये झाले 

लग्नानंतर पती पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा आणि एमआरआय मशीन साठी माहेरून पैशाची मागणी करायचा पती काही व्यभिचारी वर्तन करत असल्याचे पत्नीला समजले तिने पतीला विचारपूस केली असता त्याने शिवीगाळ करत तिला मारहाण केली आणि तिला सतत धमकी देत होता. माहेरून पैसे आण नाहीतर मर असं तो सतत तिला म्हणायचा.

सततच्या त्रासाला आणि मारहाणीला कंटाळून तिने 6 जून रोजी सांगोला येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या भावाने याची तक्रार पोलिसांत केली असून पती सुरजच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहे. या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. 

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source