आतापर्यंत 10 राज्यांमध्ये अग्निवीरांसाठी आरक्षण
राजस्थान, आसाम आणि अरुणाचलमध्येही घोषणा
वृत्तसंस्था/ गुवाहाटी/इटानगर
राजस्थान, आसाम आणि अऊणाचल प्रदेशात आता अग्निवीरला पोलीस भरतीत आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी ही घोषणा केली. 26 जुलै रोजी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात आणि छत्तीसगड सरकारने आरक्षणाची घोषणा केली होती. त्यापूर्वी 22 जुलै रोजी हरियाणा आणि उत्तराखंडच्या सरकारनेही अग्निवीर जवानांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत 10 राज्यांनी अशा घोषणा केल्या आहेत.
कारगिल विजय दिनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड सरकारनेही लष्करी सेवेतून बाहेर पडणाऱ्या अग्निवीर जवानांना राज्य पोलीस भरतीमध्ये आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी शुक्रवारी अग्निवीर म्हणून सैन्यात यशस्वी सेवा केलेल्यांना राज्य पोलीस आणि वनरक्षकांच्या भरतीमध्ये आरक्षणासह शारीरिक चाचणी तपासणीमध्ये शिथिलता दिली जाईल, असे जाहीर केले. मात्र, किती आरक्षण दिले जाणार याची माहिती देण्यात आलेली नाही.
यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफमध्ये अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केले होते. तसेच हरियाणा आणि उत्तराखंड सरकारनेही 22 जुलैलाच अग्निवीरांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ अन्य राज्यांनी माजी अग्निवीरांसाठी आरक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या विरोधी पक्षाकडून संसद अधिवेशनादरम्यान अग्निवीर योजनेविरोधात आवाज उठविला जात असतानाच भाजपशासित राज्यांनी या योजनेचे महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.
Home महत्वाची बातमी आतापर्यंत 10 राज्यांमध्ये अग्निवीरांसाठी आरक्षण
आतापर्यंत 10 राज्यांमध्ये अग्निवीरांसाठी आरक्षण
राजस्थान, आसाम आणि अरुणाचलमध्येही घोषणा वृत्तसंस्था/ गुवाहाटी/इटानगर राजस्थान, आसाम आणि अऊणाचल प्रदेशात आता अग्निवीरला पोलीस भरतीत आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी ही घोषणा केली. 26 जुलै रोजी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात आणि छत्तीसगड सरकारने आरक्षणाची घोषणा केली होती. त्यापूर्वी 22 जुलै रोजी हरियाणा आणि उत्तराखंडच्या सरकारनेही अग्निवीर जवानांना आरक्षण […]