सिंघानियांची पत्नी 3 कंपन्यांच्या संचालक मंडळातून बाहेर

रेमंड समूहाच्या कंपन्यांमधून बाहेर काढल्याचा पत्नीचा आरोप नवी दिल्ली :  रेमंड समूहाच्या तीन कंपन्यांनी गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाज मोदी यांची संचालक मंडळातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये जेके इन्वेस्टर्स लिमिटेड (जेकेएल), रेमंड कंझ्युमर केअर (आरसीसीएल)आणि स्मार्ट अॅडव्हान्सरी व फिनसर्व्ह यांनी 31 मार्च रोजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग (इजीएम) द्वारे नवाज मोदी यांची संचालक मंडळामधून हकालपट्टी […]

सिंघानियांची पत्नी 3 कंपन्यांच्या संचालक मंडळातून बाहेर

रेमंड समूहाच्या कंपन्यांमधून बाहेर काढल्याचा पत्नीचा आरोप
नवी दिल्ली : 
रेमंड समूहाच्या तीन कंपन्यांनी गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाज मोदी यांची संचालक मंडळातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये जेके इन्वेस्टर्स लिमिटेड (जेकेएल), रेमंड कंझ्युमर केअर (आरसीसीएल)आणि स्मार्ट अॅडव्हान्सरी व फिनसर्व्ह यांनी 31 मार्च रोजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग (इजीएम) द्वारे नवाज मोदी यांची संचालक मंडळामधून हकालपट्टी केली आहे. एका अहवालामध्ये याबाबत माहिती दिली आहे.
नवाज मोदी यांची जून 2015 मध्ये जेकेएल, डिसेंबर 2020 मध्ये आरसीसीएल आणि ऑक्टोबर 2017 मध्ये स्मार्ट अॅडव्हान्सरी आणि फिनसर्व्हचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अहवालानुसार, स्टॉक एक्स्चेंज लिस्टेड कंपनी रेमंडने अद्याप नवाज मोदींना संचालकमंडळातून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिलेला नाही, परंतु ती लवकरच तसे करू शकते.
रेमंड समूहाचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी 13 नोव्हेंबर 2023 रोजी पत्नी नवाज मोदी सिंघानियापासून वेगळे होण्याची घोषणा केली होती.
आधी हल्ला आता हाकलले : नवाज मोदी
आधी हल्ला केला आणि आता हाकलून दिले. यानंतर संचालक मंडळामधून  काढून टाकल्याची माहिती नवाज मोदी यांनी दिली. ‘जेव्हापासून मी गौतम सिंघानियाच्या चुकीच्या गोष्टी उघड करत आहे, तेव्हापासून मला वाईट वागणूक दिली जात आहे. आधी मारहाण केली आणि आता कंपनीतून हाकलून दिले’, असेही तिने म्हटले आहे.
विभक्तसाठी मालमत्तेत 75 टक्के वाटा हवा
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम सिंघानियाच्या विभक्त होण्याच्या घोषणेनंतर नवाज मोदींनी वेगळे होण्याची अट ठेवली होती. त्यांनी एकूण 1.4 अब्ज डॉलर्स (सुमारे 11 हजार कोटी रुपये) संपत्तीमध्ये 75 टक्के हिस्सा मागितला होता.