दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला
त्रिपुरा-मणिपूरमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान : 13 राज्यांतील 89 जागांवर निवडणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार, 26 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 64.21 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मतदान टक्केवारीची अंतिम आकडेवारी शनिवारीच निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहे. पहिल्या टप्प्यात 65 टक्क्यांवर मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात ही टक्केवारी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या जागांवर 70.05 टक्के मतदान झाले होते.
दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 89 लोकसभा जागांवर 1,206 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह पाच केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि तीन चित्रपट तारे रिंगणात आहेत. याशिवाय राहुल गांधी, शशी थरूर आणि हेमा मालिनी यांच्या मतदारसंघातही मतदान झाले. बाह्या मणिपूर मतदारसंघातील काही भागातही शुक्रवारी मतदान झाले. निवडणूक आयोगाने या जागेसाठी दोन टप्प्यात निवडणूक जाहीर केली होती.
केरळमधील लोकसभेच्या सर्व 20 जागांवर शुक्रवारी मतदान झाले. येथे सायंकाळी पाच वाजेपर्यंत 63.97 टक्के मतदान झाले. तसेच त्रिपुरामध्ये सर्वाधिक 77.93 टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 53 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 72 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर राजस्थानमध्ये 59 टक्के, छत्तीसगडमध्ये 72 टक्के, आसाममध्ये 70.66 टक्के, मध्यप्रदेशमध्ये 55 टक्के मतदान झाले आहे.
मतदानादरम्यान मणिपूरमधील उखऊल येथील एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये काही संशयित एका बूथमध्ये घुसले होते. हा प्रकार पाहून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लोकशाही हायजॅक केल्याचा आरोप केला. याआधी छत्तीसगडमधील गरिआबंद जिह्यात बूथ ड्युटीवर असताना एका पोलिसाने स्वत:वर गोळी झाडली. तो मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. बंगालमधील बलुरघाट आणि रायगंज या दोन लोकसभा जागांवर केंद्रीय दलांनी महिलांना मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसेच बंगालमध्ये भाजप नेते सुकांत मजुमदार आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये बालूरघाटात हाणामारीची घटनाही घडली.
2019 मध्ये दुसऱ्या टप्प्यात भाजपने सर्वाधिक 50 जागा जिंकल्या होत्या. तसेच रालोआ मित्रपक्षांनी 8 जागा जिंकल्या. या टप्प्यात काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. इतरांना 9 जागा मिळाल्या होत्या.
Home महत्वाची बातमी दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला
दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला
त्रिपुरा-मणिपूरमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान : 13 राज्यांतील 89 जागांवर निवडणूक वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार, 26 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 64.21 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मतदान टक्केवारीची अंतिम आकडेवारी शनिवारीच निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहे. पहिल्या […]