बेळगावात सिल्क साडी प्रदर्शनाला प्रारंभ

बेळगावात सिल्क साडी प्रदर्शनाला प्रारंभ

अडीच लाखापर्यंतच्या साड्यांचा समावेश : 12 जुलैपर्यंत राहणार प्रदर्शन
प्रतिनिधी/ बेळगाव
अभिवृद्धी प्रस्तुत ‘सिल्क इंडिया 2024’ हे भव्य प्रदर्शन 5 ते 12 जुलै दरम्यान गांधी भवन बेळगावमध्ये भरविण्यात आले आहे. सिल्क कॉटन यासह विविध प्रकारच्या साड्यांचा समावेश या प्रदर्शनामध्ये आहे. ऊपये पाचशे पासून अडीच लाख ऊपये किमतीच्या साड्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. बेळगावचे पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग यांच्या पत्नी सुश्मिता मार्टिन यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
भारत हा रेशीम उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश आहे. रेशमी कापडाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. रेशमाच्या टसर, इरी, मुलबेरी, मुगा अशा चार जाती आहेत. यापैकी टसर व मुगा हे रेशमीचे जंगली वाण आहेत. बिहार, आसाम व छत्तीसगड या राज्यांमध्ये टसर व मुगा यांचे उत्पादन घेतले जाते. टसर सिल्कपासून अरणी सिल्क साडी, व्रेप, सिफॉन व जॉर्जेटच्या साड्या उत्पादित केल्या जातात. इतर रेशमापासून कांजीवरम व लग्नाच्या साड्या तयार होतात.
याचबरोबर भारतातील साडी हॅण्डलूम, सिल्क कॉटन, सिल्क ब्लेड्स, स्टोल्स सिल्क, शॉल्स, उप्पड, पैठणी, मंगलगिरी, पोचमपल्ली यासारख्या साड्या तयार केल्या जातात. या प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारच्या सिल्क साड्यांबरोबरच इतर उत्पादनेही मिळणार आहेत. सिल्कच्या प्रिंटेट साड्या, सिल्क बेडशिट, डिझायनर डेस मटेरियल, लेहंगा, कुर्ता, आसाम मुगा पॅब्रिक, अपूर्वा सिल्क साडी, जरदोसी, लखनौ, चिकनवर्क, प्रिंटेड साड्या, बनारसी, रेशमी, बुट्टी, माहेश्वरी, चंदेरी सिल्क,  कोटा सिल्क, मुलबेरी सिल्क, टेंपल बोर्डर यासह इतर साड्या या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.