सिकंदर रझाकडे झिंबाब्वेचे नेतृत्व

वृत्तसंस्था/हरारे 6 जुलैपासून येथे सुरू होणाऱ्या भारताविरूध्दच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी झिंबाब्वेच्या संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज सिकंदर रझाची घोषणा करण्यात आली आहे. झिंबाब्वे क्रिकेट संघटनेने या मालिकेसाठी आता बेल्जियममध्ये जन्मलेल्या अॅन्टुम नक्वीचा संघात समावेश केला आहे. झिंबाब्वे संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी जस्टीन सॅमन्स यांची नियुक्ती केली आहे. विंडीज आणि अमेरिका येथे नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक […]

सिकंदर रझाकडे झिंबाब्वेचे नेतृत्व

वृत्तसंस्था/हरारे
6 जुलैपासून येथे सुरू होणाऱ्या भारताविरूध्दच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी झिंबाब्वेच्या संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज सिकंदर रझाची घोषणा करण्यात आली आहे. झिंबाब्वे क्रिकेट संघटनेने या मालिकेसाठी आता बेल्जियममध्ये जन्मलेल्या अॅन्टुम नक्वीचा संघात समावेश केला आहे.
झिंबाब्वे संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी जस्टीन सॅमन्स यांची नियुक्ती केली आहे. विंडीज आणि अमेरिका येथे नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत झिंबाब्वेचा संघ आपली पात्रता सिध्द करु शकला नव्हता. भारता विरुध्दच्या मालिकेसाठी झिंबाब्वेच्या निवड समितीने अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचा समावेश असलेला संघ निवडला आहे. 38 वर्षीय सिकंदर रझा हा या संघातील सर्वात अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याने आतापर्यंत 86 सामने खेळले असून त्यानंतर 29 वर्षीय लुक जॉंग्वे हा या संघातील दुसरा अनुभवी खेळाडू आहे. रिचर्ड निगरेव्हा, मुझार बनी क्रेग, इर्विन, सिन विलीयम्स यांचा समावेश आहे.
झिंबाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), आक्रम फराझ, बेनेट ब्रायन, जोनाथेन,  चेतरा तेंडाई, जाँग्वे लुक, इनोसेंट, एम. क्लाईव्ह, वेस्ले, टी. मेरुमनी, मासाकेझा, वेलिंग्टन, ब्रेन्डॉन, ब्लेसिंग, डियॉन, नक्वी अंतुम, रिचर्ड आणि एस. मिल्टन.