विधी परीक्षांचे अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर; विनाविलंब शुल्कासह 17 ते 30 मे अर्ज भरण्यास मुदत

विधी परीक्षांचे अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर; विनाविलंब शुल्कासह 17 ते 30 मे अर्ज भरण्यास मुदत

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत तीन व पाच वर्षाचा विधी अभ्यासक्रम सुरू आहे. विधी अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष 2023-24च्या मार्च-एप्रिल उन्हाळी सत्रातील परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या आहेत. तसेच महाविद्यालयांना ईमेलव्दारे परिपत्रक काढून कळवण्यात आल्या आहेत. तरी विद्यार्थ्यांनी याची दखल घेवून वेळेत परीक्षा अर्ज भरावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
विधी अभ्यासक्रमाच्या तीन व पाच वर्षीय सत्र परीक्षांचे अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी विनाविलंब शुल्कासह महाविद्यालयात अथवा पदव्युत्तर अधिविभागामध्ये परीक्षा अर्ज 17 ते 30 मे दरम्यान भरावयाचा आहे. विलंब शुल्कासह 1 ते 6 जून दरम्यान तर अतिविलंब शुल्कासह 5 ते 8 जून दरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरावयाचा आहे. महाविद्यालय अथवा पदव्युत्तर अधिविभागाने परीक्षा अर्जाला ऑनलाईन अॅप्रुव्हल विनाविलंब शुल्कासह 31 मे विलंब शुल्कासह 4 जून तर अतिविलंब शुल्कासह 8 जून रोजी द्यावयाचे आहे. महाविद्यालय अथवा पदव्युत्तर अधिविभागाने परीक्षा अर्ज विधीपीठात विनाविलंब शुल्कासह 3 जून विलंब व अतिविलंब शुल्कासह 11 जूनपर्यंत परीक्षा अर्ज व परीक्षा शुल्क जमा करावयाचे आहे. तरी याची महाविद्यालय, अधिविभाग आणि विद्यार्थ्यांनी दखल घेवून परीक्षा अर्ज भरावयाचा आहे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.