कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक, आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी

महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका शाळेत मुलींचे लैंगिक शोषण झाल्यामुळे जनतेत संताप आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी लोक करत आहेत. दरम्यान कल्याण पूर्वेतील आधिवली परिसरात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. …

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक, आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी

महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका शाळेत मुलींचे लैंगिक शोषण झाल्यामुळे जनतेत संताप आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी लोक करत आहेत. दरम्यान कल्याण पूर्वेतील आधिवली परिसरात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. मानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धर्मेंद्र यादव असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील आधिवली परिसरात 10 वर्षांची अल्पवयीन मुलगी काही मित्रांसोबत खेळत असताना तिच्या एका मित्राच्या घरी गेली. मुलाच्या वडिलांनी तिला एका निर्जन ठिकाणी नेले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

 

या घटनेने दुखावलेल्या मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलीला घेऊन लगेच मानपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या घटनेची गंभीर दखल घेत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कडबाने यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी धर्मेंद्र यादव याला अटक केली.

 

पोलिसांनी आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले, तेथून न्यायालयाने धर्मेंद्र यादवला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

Go to Source