छत्तीगडमध्ये वृद्ध रुग्णाची खासगी रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील मेडलाइफ रुग्णालयामधील एका वृद्ध रुग्णाने रविवारी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राम विशाल असे रुग्णाचे नाव असून त्यांना मानसिक आजारामुळे मेडलाइफ रुग्णालयात दाखल करण्यात आले …

छत्तीगडमध्ये वृद्ध रुग्णाची खासगी रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील मेडलाइफ रुग्णालयामधील एका वृद्ध रुग्णाने रविवारी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार राम विशाल असे रुग्णाचे नाव असून त्यांना मानसिक आजारामुळे मेडलाइफ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच उंचावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृताचे वय 60 वर्षे असून ते ओडिशाचे रहिवासी होते.

 

तसेच त्यांना 22 ऑगस्ट रोजी मायग्रेनच्या समस्येवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. सोमवारी सकाळी मृतदेहाचे पोस्टमोर्टम झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source