सर्व महाविद्यालयांमध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण बंधनकारक
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुंबई (mumbai) उपनगरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि शासकीय वसतिगृहांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक संस्थेने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. राज्यातील (maharashtra) सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुंबई उपनगरातील प्रत्येक महाविद्यालयात सप्टेंबरपासून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच सरकारी आणि खाजगी संस्थांनी कडक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. यावेळी त्यांनी शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांनीही तेथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.ज्या शाळा-महाविद्यालयांमध्ये महिला स्वच्छतागृहे आहेत, तेथे महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.हेही वाचामहाराष्ट्रातील मतदार यादीत ‘अशा’ प्रकारे नोंदवा तुमचा नंबरBadlapur News : बदलापुरातील तब्बल 300 आंदोलकांवर गुन्हे
Home महत्वाची बातमी सर्व महाविद्यालयांमध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण बंधनकारक
सर्व महाविद्यालयांमध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण बंधनकारक
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुंबई (mumbai) उपनगरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि शासकीय वसतिगृहांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक संस्थेने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
राज्यातील (maharashtra) सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुंबई उपनगरातील प्रत्येक महाविद्यालयात सप्टेंबरपासून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच सरकारी आणि खाजगी संस्थांनी कडक सुरक्षा उपाययोजना कराव्यात.
यावेळी त्यांनी शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांनीही तेथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.
ज्या शाळा-महाविद्यालयांमध्ये महिला स्वच्छतागृहे आहेत, तेथे महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.हेही वाचा
महाराष्ट्रातील मतदार यादीत ‘अशा’ प्रकारे नोंदवा तुमचा नंबर
Badlapur News : बदलापुरातील तब्बल 300 आंदोलकांवर गुन्हे