साथियानची मानांकनात उडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या पुरूष आणि महिला टेबल टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या जी. साथियानने 60 व्या स्थानावर उडी घेतली आहे. तर महिलांच्या विभागात भारताच्या श्रीजा अकुलाने 40 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
पुरुषांच्या विभागातील मानांकन यादीत साथियानचे स्थान 43 अंकांनी वधारले आहे. यापूर्वी साथियानने या मानांकन यादीत 24 वे स्थान पटकाविले होते. बैरुतमधील स्पर्धेत साथियानने जेतेपद मिळविल्याने त्याला 125 मानांकन गुण मिळाले. या यादीत भारताचा शरथ कमल 35 व्या स्थानावर आहे. मानव ठक्कर आणि हरमित देसाई यांनीही पहिल्या 100 स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले आहे. महिलांच्या विभागात भारताच्या श्रीजा अकुलाने 40 वे स्थान पटकाविले आहे. अलिकडेच श्रीजाने फिडर सिरीज टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. महिलांच्या यादीत मनिका बात्रा 38 व्या तर अर्चना कामत 99 व्या स्थानावर आहे.
Home महत्वाची बातमी साथियानची मानांकनात उडी
साथियानची मानांकनात उडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या पुरूष आणि महिला टेबल टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या जी. साथियानने 60 व्या स्थानावर उडी घेतली आहे. तर महिलांच्या विभागात भारताच्या श्रीजा अकुलाने 40 व्या स्थानावर झेप घेतली आहे. पुरुषांच्या विभागातील मानांकन यादीत साथियानचे स्थान 43 अंकांनी वधारले आहे. यापूर्वी साथियानने या मानांकन यादीत […]