संजय झा जेडीयुचे कार्यकारी अध्यक्ष

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नितीशकुमारांची घोषणा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जेडीयु नेते संजय झा यांची शनिवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये झालेल्या या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. याचदरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी झा यांची कार्यकारी […]

संजय झा जेडीयुचे कार्यकारी अध्यक्ष

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नितीशकुमारांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जेडीयु नेते संजय झा यांची शनिवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये झालेल्या या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. याचदरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी झा यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
संजय झा हे बिहारमधील मधुबनी जिह्यातील झांझारपूर भागातील अरादिया गावचे रहिवासी आहेत. जेडीयुमध्ये येण्यापूर्वी संजय झा भाजपमध्ये होते. ब्राह्मण समाजाचे असलेले संजय झा मिथिलांचलमधील जेडीयुचे मोठे नेते मानले जातात. ते राज्यसभेचे खासदार आणि पक्षाचे संसदीय नेते आहेत. त्यांनी 2014 मध्ये दरभंगा येथून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2014 ते 2024 पर्यंत बिहार सरकारमध्ये ते मंत्रीही होते. त्यांचे भाजपशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपशी चांगल्या अटींवर करार करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील.  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी बूथ स्तरावर पक्ष मजबूत करण्यावर चर्चा झाली.
पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली : संजय झा
जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बनल्यानंतर पक्षाचे खासदार संजय झा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमचे नेते आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. मी त्यांचा आभारी आहे. नितीशकुमार यांनी बिहार बदलला असून पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या कल्याणासाठी आपण तत्पर असल्याचे झा यांनी स्पष्ट केले.