रामचरणच्या चित्रपटात दिसणार सई
बॉलिवूड अभिनेत्री सई मांजरेकर लवकरच अभिनेता रामचरणसोबत मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. निखिल सिद्धार्थ यांच्या एका पीरियड पॅन इंडियन चित्रपटात तिची वर्णी लागली आहे. रामचरण आणि निखिल यांचा आगामी चित्रपट ‘द इंडिया हाउस’मध्ये सई मुख्य भूमिका साकारणार आहे. हम्पी येथे या चित्रपटाच्या चित्रिकरणापूर्वी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटाच्या पूर्ण टीमने हम्पीच्या विरुपाक्ष मंदिरात जात प्रार्थना केली आहे.
राम चरण आणि निखिल यांच्या या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. अभिषेक अग्रवाल आर्ट्सकडून निर्मित या चित्रपटात 1905 च्या काळातील एक सुंदर प्रेमकहाणी दिसून येणार आहे. राम वामसी कृष्ण या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
सई मांजरेकर यापूर्वी वरुण तेजचा ‘घनी’, अदिवी शेषसोबत ‘मेजर’ आणि राम पोथिनेनीच्या ‘स्कंद’ या चित्रपटात दिसुन आली आहे. सई सध्या स्वत:चा आगामी हिंदी चित्रपट ‘औरों में कहां दम था’च्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहे. यात ती अजय देवगण आणि तब्बूसोबत मुख्य भूमिका साकारत आहे.
Home महत्वाची बातमी रामचरणच्या चित्रपटात दिसणार सई
रामचरणच्या चित्रपटात दिसणार सई
बॉलिवूड अभिनेत्री सई मांजरेकर लवकरच अभिनेता रामचरणसोबत मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. निखिल सिद्धार्थ यांच्या एका पीरियड पॅन इंडियन चित्रपटात तिची वर्णी लागली आहे. रामचरण आणि निखिल यांचा आगामी चित्रपट ‘द इंडिया हाउस’मध्ये सई मुख्य भूमिका साकारणार आहे. हम्पी येथे या चित्रपटाच्या चित्रिकरणापूर्वी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटाच्या पूर्ण टीमने हम्पीच्या विरुपाक्ष मंदिरात […]