पाटीलमळा येथील ‘त्या’ कूपनलिकेची दुरुस्ती

बेळगाव : वॉर्ड क्रमांक 10 मधील पाटीलमळा येथील कूपनलिकेची मोटार नादुरुस्त झाली होती. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून या परिसरात पाण्याची समस्या काहीशी गंभीर झाली होती. कूपनलिका दुरुस्ती करण्याबाबत आमदार राजू सेठ यांनी एल अॅण्ड टी कंपनीला सूचना दिली होती. नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत शुक्रवारी कूपनलिकेला नव्याने मोटार बसविण्यात […]

पाटीलमळा येथील ‘त्या’ कूपनलिकेची दुरुस्ती

बेळगाव : वॉर्ड क्रमांक 10 मधील पाटीलमळा येथील कूपनलिकेची मोटार नादुरुस्त झाली होती. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून या परिसरात पाण्याची समस्या काहीशी गंभीर झाली होती. कूपनलिका दुरुस्ती करण्याबाबत आमदार राजू सेठ यांनी एल अॅण्ड टी कंपनीला सूचना दिली होती. नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत शुक्रवारी कूपनलिकेला नव्याने मोटार बसविण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबाबत आमदार राजू सेठ यांनी महापालिकेमध्ये एल अॅण्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य ती सूचना केली होती. त्यानुसार आता शहरातील बंद असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती सुरू केली आहे. शहापूर परिसरानंतर आता शहरामध्येही त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. अजूनही काही ठिकाणी कूपनलिका बंद असून त्यांचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Go to Source