रमाकांत कोंडुस्कर यांनी आनंदनगर परिसराला दिली भेट
बेळगाव : आनंदनगर, साई कॉलनी, केशवनगर, वडगाव परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. रोजच चोऱ्या होत असल्यामुळे जनता अक्षरश: हतबल झाली आहे. जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे म. ए. समितीचे नेते आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी त्या ठिकाणी भेट दिली. रात्री युवकांसोबत गस्त घालण्यासाठी आपणही उपस्थित राहू, असे आश्वासन दिले. गेल्या आठवड्याभरापासून वडगावमधील या परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरी झालेल्यांच्या घरी रमाकांत कोंडुस्कर यांनी भेट दिली. त्यांनी तेथील नागरिकांच्या भावना समजावून घेतल्या. पोलिसांनाही याबाबत गस्त वाढविण्यासाठी विनंती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर आपले कार्यकर्तेही या परिसरात गस्त घालण्यास तयार आहेत. याबाबत पोलिसांशी चर्चा करून खडा पहारा ठेवण्याबाबत विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
Home महत्वाची बातमी रमाकांत कोंडुस्कर यांनी आनंदनगर परिसराला दिली भेट
रमाकांत कोंडुस्कर यांनी आनंदनगर परिसराला दिली भेट
बेळगाव : आनंदनगर, साई कॉलनी, केशवनगर, वडगाव परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. रोजच चोऱ्या होत असल्यामुळे जनता अक्षरश: हतबल झाली आहे. जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे म. ए. समितीचे नेते आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी त्या ठिकाणी भेट दिली. रात्री युवकांसोबत गस्त घालण्यासाठी आपणही उपस्थित […]