बी-बियाणांचे दर कमी करा
नेगीलयोगी रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन
बेळगाव : दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना बी-बियाणांचे भाववाढ करून सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर रासायनिक खतांसह शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे भाव वाढविण्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात लोटला गेला आहे. राज्य सरकारने याची त्वरित दखल घेवून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून बी-बियाणांचे भाव कमी करावेत, अशी मागणी नेगिलयोगी रयत सेवा संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून करण्यात आली.
सध्या पावसाला सुरूवात झाल्याने पेरणीचा हंगाम जोरात आहे. मात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बी-बियाणांवर 65 ते 70 टक्के भाव वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ही भाववाढ मारक असून त्वरित भाववाढ कमी करण्यात यावी. शेतवडीत वीज संपर्क घेण्यासाठी शेतकऱ्यांनीच यासाठी लागणारा खर्च भरावा, असा आदेश जारी केला आहे. सदर आदेश मागे घेण्यात यावा. जमिनीसंदर्भातील कागदोपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहे. ते कमी करण्यात यावेत. पेट्रोल, डिझेल, गृहोपयोगी गॅस सिलिंडर आदी इंधनांवरील राज्य सरकारकडून वाढविण्यात आलेले कर कमी करण्यात यावेत.
शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्या
राज्यातील पाणी पुरवठा योजनांचे काम त्वरित हाती घेण्यात यावेत, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना किमान भाव देण्यात यावा, जिल्ह्यातील तालुका रयत कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, तालुका कार्यालयांमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यात यावा, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्व पिकांना हमीभाव देण्यात यावा, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेवून सूचना करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी रमाकांत कोंडुस्कर, राजू मरवे, राजू पुजारी, बसाप्पा गोडजी व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी बी-बियाणांचे दर कमी करा
बी-बियाणांचे दर कमी करा
नेगीलयोगी रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन बेळगाव : दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना बी-बियाणांचे भाववाढ करून सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर रासायनिक खतांसह शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे भाव वाढविण्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात लोटला गेला आहे. राज्य सरकारने याची त्वरित दखल घेवून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून बी-बियाणांचे भाव कमी करावेत, अशी मागणी […]