आणीबाणी निषेधार्थ भाजपची निदर्शने

काँग्रेस कार्यालयावर मोर्चाचा प्रयत्न, रस्त्यामध्येच अडवून कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात बेळगाव : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात देशाच्या घटनेविरोधात जाऊन आणीबाणी लागू केली होती. याला विरोध म्हणून भाजपकडून काळादिन पाळण्यात येत आहे. सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामधाम येथून काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी रस्त्यामध्येच भाजप कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतले. देशामध्ये घटनेविरोधात जाऊन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये […]

आणीबाणी निषेधार्थ भाजपची निदर्शने

काँग्रेस कार्यालयावर मोर्चाचा प्रयत्न, रस्त्यामध्येच अडवून कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बेळगाव : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात देशाच्या घटनेविरोधात जाऊन आणीबाणी लागू केली होती. याला विरोध म्हणून भाजपकडून काळादिन पाळण्यात येत आहे. सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामधाम येथून काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी रस्त्यामध्येच भाजप कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतले. देशामध्ये घटनेविरोधात जाऊन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी लागू केली होती. या माध्यमातून त्यांनी देशातील जनतेच्या हक्कांवर गदा आणली होती. प्रत्येक वर्षी भाजपकडून हा दिवस काळादिन म्हणून पाळण्यात येतो.
या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढून भित्तीपत्रके लावण्याचे नियोजन केले होते. यासाठी अनेक भाजप कार्यकर्ते, आजी-माजी आमदार मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सरकारी विश्रामधाम येथून मोर्चाला सुरूवात झाली. दरम्यान राज्य सरकार व काँग्रेस पक्षाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. राज्य सरकारचा निषेध नोंदविला. मार्केट पोलीस स्थानकासमोरुन मोर्चा किर्ती हॉटेलकडे आला असता पोलिसांनी मोर्चेकरांना तेथे रोखून धरले. काँग्रेस कार्यालयावर जाण्यापासून अडविले.आणीबाणी जारी करून जनतेच्या हक्कांवर गदा आणलेल्या काँग्रेस सरकारला घटनेबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसने या परिस्थितीची जाणिव ठेवून जाहीरमाफी मागावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून केली.
पोलिसांचा विरोध झुगारुन पुढे जाण्याचा प्रयत्न
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोध झुगारुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखून धरून पोलीस वाहनांतून इतरत्र नेण्यात आले. तेथून नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, मुरगेंद्रगौड आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.