रिअल इस्टेटएजंट, जेसीबी चालकास अटक

एजंट अर्शद ख्वाजा दोनापावलाचा : जेसीबीचालक प्रदीप राणा कळंगुटचा  म्हापसा : पोलिसांवरील वाढत्या दबावामुळे अखेर आसगाव येथील आगरवाडेकर यांच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांकडून रिअल इस्टेट एजंट अर्शद ख्वाजा (वय 51) राहणारा दोनापावल याला तसेच जेसीबीचालक प्रदीप राणा यालाही अटक करण्यात आली आहे. प्रदीप आगरवाडेकर यांचे राहते घर जेसीबी घालून बाऊन्सरच्या सहकार्याने व पोलिसांना हाताशी […]

रिअल इस्टेटएजंट, जेसीबी चालकास अटक

एजंट अर्शद ख्वाजा दोनापावलाचा : जेसीबीचालक प्रदीप राणा कळंगुटचा 
म्हापसा : पोलिसांवरील वाढत्या दबावामुळे अखेर आसगाव येथील आगरवाडेकर यांच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांकडून रिअल इस्टेट एजंट अर्शद ख्वाजा (वय 51) राहणारा दोनापावल याला तसेच जेसीबीचालक प्रदीप राणा यालाही अटक करण्यात आली आहे. प्रदीप आगरवाडेकर यांचे राहते घर जेसीबी घालून बाऊन्सरच्या सहकार्याने व पोलिसांना हाताशी धरून दिल्ली येथील पूजा शर्मा नामक बिल्डरने जमिनदोस्त करण्यास लावले होते. त्यानंतर प्रसारमाध्यम व लोकप्रतिनिधांनी यावर आवाज उठविल्यानंतर सरकारवर चौफेर टीका झाली. अटक केलेला अर्शद ख्वाजा हा दलाल असून मुख्य संशयित आरोपी पूजा शर्मा खुलेआम फिरत असल्याचे आगरवाडेकर कुटुंबीयांनी सांगितले. प्रिन्शा प्रदीप आगरवाडेकर यांच्या तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांनी संशयित पूजा शर्मा व इतर संशयितांविऊद्ध रविवारी गुन्हा नोंद केला. सोमवारी आमदार डिलायला लोबो यांनी आगरवाडेकर कुटुंबीयांना हणजूण पोलीस स्थानकात नेल्यावर दबावापोटी प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी जेसीबीचालक प्रदीप राणा (32) राहणारा कळंगुट याला अटक केली आहे.
सखोल चौकशीची कुटुंबीयांची मागणी
पूजा शर्मा या बिगर गोमंतकीय महिलेने फॉर्म 1 व 14 वर त्यांचे नाव नोंद असल्याचा दावा केला आहे. त्यांनी मूळ मालकाकडून जमीन खरेदी केल्याचे सांगून आगरवाडेकर कुटुंब हे भाडेकरू असल्याचा आरोप केला आहे. शर्मा यांच्या दाव्यानंतरही आगरवाडेकरांना घरातून हटविण्यासाठी वापरलेल्या पद्धतीच्या कायद्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान, प्रदीप आगरवाडेकर यांनी आपण घराचे पैसे भरले पण विक्री करार पूर्ण केला नसल्याचे सांगितले. यामुळे  आपणास न्याय द्यावा, अपहरण करणाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी आगरवाडेकर कुटुंबीयांनी केली आहे.