कोकण पदवीधरसाठी सावंतवाडीत सकाळपासून शांततेत मतदान

कोकण पदवीधरसाठी सावंतवाडीत सकाळपासून शांततेत मतदान

सावंतवाडी | प्रतिनिधी
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठीची मतदान प्रक्रियेला आज बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून शांततेत सुरुवात झाली. सावंतवाडी केंद्रांवर सकाळपासून तुरळक मतदार आपला हक्क बजावण्यासाठी दाखल होत होते. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. सावंतवाडी शहरात तहसीलदार कार्यालय, जि . प . शाळा नंबर ५ या दोन ठिकाणी मतदान केंद्रे आहेत. आज सकाळीच सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत उर्फ बाळराजे सावंत भोसले व युवराज लखम सावंत भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळीच महिला मतदारांची हजेरी मतदान केंद्रावर अधिक दिसत होती. . जवळपास पहिल्या पसंतीचे मत तसेच मतपत्रिकेवर उमेदवारांची संख्या अधिक असल्याने इतर मतदान प्रक्रिया आणि पदवीधर मतदारसंघाची प्रक्रिया वेगळी असल्याने अनेकांना मतदान करताना संभ्रम निर्माण होत होता. मतपत्रिकेवर उमेदवाराच्या समोर आपल्या पसंतीचे मत समोर क्रमांक टाकून नोंदवायचे होते अशा पद्धतीने आज मतदान प्रक्रिया सुरू झाली होती. प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील हे मतदान केंद्रावर लक्ष ठेवून होते. मतदान केंद्राबाहेर भाजप व महायुतीचे तसेच इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक मतदाराला बॅलेट पेपर नुसार नंबर सांगत होते . भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, युवराज लखम सावंत भोसले ,संजू शिरोडकर, दिनेश सारंग ,माजी नगराध्यक्ष संजू परब ,मनोज नाईक ,महेश सारंग, रवींद्र मडगावकर ,मोहिनी मडगावकर आदी पदाधिकारी ,कार्यकर्ते पाहायला मिळत होते. तर इंडिया आघाडीतर्फे शहर अध्यक्ष ऍड . राघवेंद्र नार्वेकर ,महेंद्र सांगेलकर ,रुपेश राऊळ संजय लाड , विकास सावंत ,प्रवीण भोसले, ऍड दिलीप नार्वेकर आदी पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.