ना उड्डाणपुल…ना सर्व्हिस रोड कुवारबाव बाजारपेठेत सरळ मार्ग!
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी मिऱ्या-नागपूर महामार्ग पदरीकरणात शहरानजिकाया कुवारबाव येथे बाजारपेठ वाचविण्यासाठी उड्डाण पुल की सर्व्हिस रोड याबाबत येथील व्यापारी व रहिवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला होता. अखेर हा संभ्रम दूर झाला असून बाजारपेठेत सध्या अस्तित्वातील मार्गावरा पदरीकरणाद्वारे सरळ मार्ग तयार केला जाणार असल्यो महामार्ग पकल्प अधिकारी वसंत पंदेरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.