विरार-अलिबाग प्रवास होणार वेगवान

विरार-अलिबाग प्रवास होणार वेगवान

मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरार ते अलिबाग बहुउद्देशीय परिवहन कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून 22,250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.विरार ते अलिबाग कॉरिडोर प्रकल्प हा बहुप्रतिक्षित प्रकल्प आहे. या कॉरिडोरमुळे विरार (Virar) ते अलिबाग (Alibag) हे अंतर वेगवान आणि कमी कालावधीत पार करता येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई (Mumbai), ठाणे(Thane), भिवंडी (Bhiwandi) येथील मार्गांवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या देखील कमी होणार आहे. तसेच हा राज्यातील रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मागणीनुसार या कर्जासाठी शासकीय हमी देण्यात येईल. एकूण 1130 हेक्टर जमीन संपादित करायची असून एकूण 215.80 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. तरी, उर्वरित जमीन संपादन करण्याचे कार्य चालू आहे. तसेच प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी जवळ जवळ 2341कोटी 71 लाख रुपये देण्यात आले आहेत.हेही वाचा आचार्य-मराठे कॉलेजमध्ये हिजाब बंदी कायमलांब पल्ल्याच्या गाड्या आणि स्थानकांवरील खाण्याच्या स्टॉल्सवर IRCTCची नजर

Go to Source