न्यायालयाच्या आवारात थरार ! आरोपीकडून साक्षीदारावर कोयत्याने वार
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालय येथे मुख्य न्यायदंडाधिकरी यांच्या व्हरांड्यात आरोपीने साक्षीदारावर कोयत्याने सपासप वार केल़े. ही घटना गावारी सकाळी 11 च्या सुमारास घडल़ी अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण न्यायालय परिसरात एका खळबळ उडाल़ी योगेश रमेश चाळके (32, ऱा टिके-चाळकेवाडी) असे जखमीचे नाव आह़े न्यायालयातील पोलिसांकडून जखमी योगेश याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल़े तर कोयत्याने वार केल्यापकरणी शहर पोलिसांकडून स्वाप जयसिंग राऊत (ऱा हरचेरी, रत्नागिरी) याच्यावाद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.