राकसकोप जलाशयाची पाणीपातळी स्थिर
वार्ताहर /तुडये
जून महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने अजूनही जोर दिला नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी स्थिर आहे. शुक्रवारी सकाळी जलाशय पाणीपातळी 2451.40 फूट इतकी होती. मागील वर्षी याच दिवशी 2447 फूट इतकी डेडस्टॉकमधील पाणीपातळी होती. शुक्रवारी सकाळी 28.3 मि.मी. पावसाची नोंद झाली तर एकूण 376.3 मि. मी. पाऊस झाला.
मागील वर्षी याच दिवशी 202.6 मि.मी. असा कमी पाऊस झाला होता. जून महिन्यात आतापर्यंत 225.6 मि.मी. पाऊस झाला आहे. 20 जून रोजी पाणीपातळी 2451 फूट होती. यामध्ये आठवडाभरात केवळ 0.60 फूट पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जलाशयातून दररोज दीड इंच पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाच्या पाण्याचा येणारा ओघ तुरळक प्रमाणातील आहे.
1 जून रोजी पाणीपातळी 2453.60 फूट होती. 28 दिवसांत दोन फूट पाणीसाठा शहराला सोडण्यात आला आहे. रोज दीड इंच पाण्याचा विचार केल्यास शहराला साडेतीन फूट पाणी सोडण्यात आले आहे. डेडस्टॉकवरील चार फूट पाणीसाठा अजूनही उपलब्ध आहे. मार्कंडेय नदी व नाल्यातून जलाशयाला कमी प्रमाणातील पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने पाणीसाठ्यात इंच-दोन इंच या प्रमाणात वाढ होत आहे.
Home महत्वाची बातमी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी स्थिर
राकसकोप जलाशयाची पाणीपातळी स्थिर
वार्ताहर /तुडये जून महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने अजूनही जोर दिला नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी स्थिर आहे. शुक्रवारी सकाळी जलाशय पाणीपातळी 2451.40 फूट इतकी होती. मागील वर्षी याच दिवशी 2447 फूट इतकी डेडस्टॉकमधील पाणीपातळी होती. शुक्रवारी सकाळी 28.3 मि.मी. पावसाची नोंद झाली तर एकूण 376.3 मि. मी. पाऊस झाला. मागील वर्षी याच दिवशी 202.6 […]