तालुका पंचायत अधिकाऱ्यांना 40 हजारांची लाच घेताना अटक
लोकायुक्त अधिकाऱ्यांची दोन अधिकाऱ्यांवर कारवाई
बेळगाव : पीठाच्या गिरणीला लागणारे दगड बनवण्याचा कारखाना सुरू करण्यासाठीच्या नकाशाला मंजुरी देण्यासाठी 40 हजारांची लाच घेताना तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यासह दोघा जणांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. शुक्रवारी तालुका पंचायत कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. लोकायुक्त विभागाचे पोलीसप्रमुख हणमंत राय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा हुलगूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या कारवाईने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रामारे•ाr पाटील व केसवर्कर वैजनाथ सनदी यांना अटक झाली आहे. नावगे येथील 22 गुंठे 8 आणे शेतजमिनीत गिरणीसाठी लागणारे दगड तयार करणारा कारखाना सुरू करण्यासाठी काकतीवेस रोड येथील शहानवाजखान अब्दुलरेहमान पठाण यांनी तालुका पंचायतीकडे नकाशाला अनुमती मागितली होती. कारखान्याच्या आराखड्याला अनुमोदन देण्यासाठी तालुका पंचायतीमधील अधिकाऱ्यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. गुरुवार दि. 27 जून रोजी या अधिकाऱ्यांनी शहानवाजखान यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांनी थेट लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. तालुका पंचायत कार्यालयात शहानवाजखान यांच्याकडून 40 हजार रुपये घेताना कार्यकारी अधिकारी रामारे•ाr पाटील व केसवर्कर वैजनाथ सनदी यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी तालुका पंचायत अधिकाऱ्यांना 40 हजारांची लाच घेताना अटक
तालुका पंचायत अधिकाऱ्यांना 40 हजारांची लाच घेताना अटक
लोकायुक्त अधिकाऱ्यांची दोन अधिकाऱ्यांवर कारवाई बेळगाव : पीठाच्या गिरणीला लागणारे दगड बनवण्याचा कारखाना सुरू करण्यासाठीच्या नकाशाला मंजुरी देण्यासाठी 40 हजारांची लाच घेताना तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यासह दोघा जणांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. शुक्रवारी तालुका पंचायत कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. लोकायुक्त विभागाचे पोलीसप्रमुख हणमंत राय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा हुलगूर व त्यांच्या […]