हिंगोली जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी, राज्य महामार्गावरील वाहतूक बंद

पावसाने 8 दिवसची विश्रांती घेतल्यावर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्री सलग चार तास पाऊस कोसळला या मुळे नदी ओढ्यात पूर आला असून रस्त्यावर पाची साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे हिंगोली संभाजीनगर राज्य …

हिंगोली जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी, राज्य महामार्गावरील वाहतूक बंद

पावसाने 8 दिवसची विश्रांती घेतल्यावर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्री सलग चार तास पाऊस कोसळला या मुळे नदी ओढ्यात पूर आला असून रस्त्यावर पाची साचले आहे. 

रस्त्यावर पाणी साचल्यामुळे हिंगोली संभाजीनगर राज्य महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. पाणी ओसरल्यावर वाहतूक पुन्हा उघडली जाणार.  

सध्या औढा -जिंतूर राज्य मार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. कंत्राटदाराने चुकीचे काम केल्यामुळे  मुसळधार पावसाचे पाणी परिसरातील शेतात शिरले आहे. त्यामुळे  हळद, सोयाबीन, कापसाच्या पिकांना शेतात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

कंत्राटदाराला वाहतूक खंडित झाल्यामुळे प्रशासनाने सूचना देत वाहतूक सुरळीत होण्यासाठी मार्ग सुरु करण्याचे आदेश दिले आहे. 

Edited by – Priya Dixit 

Go to Source