रेल्वेची कर्नाटकवर 190 धावांची आघाडी

वृत्तसंस्था /सुरत 2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे इलाईट क गटातील सुरु असलेल्या सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर रेल्वेने कर्नाटकावर 190 धावांची  आघाडी मिळवली आहे. या सामन्यात रेल्वेचा पहिला डाव 155 धावांत आटोपल्यानंतर कर्नाटकाने 6 बाद 90 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि आणि त्याचे शेवटचे चार गडी 84 धावांची भर घालत […]

रेल्वेची कर्नाटकवर 190 धावांची आघाडी

वृत्तसंस्था /सुरत
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे इलाईट क गटातील सुरु असलेल्या सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर रेल्वेने कर्नाटकावर 190 धावांची  आघाडी मिळवली आहे. या सामन्यात रेल्वेचा पहिला डाव 155 धावांत आटोपल्यानंतर कर्नाटकाने 6 बाद 90 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि आणि त्याचे शेवटचे चार गडी 84 धावांची भर घालत तंबूत परतले. कर्नाटकाचा पहिला डाव 50.5 षटकात 174 धावात आटोपला. कर्नाटकाच्या पहिल्या डावात एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. रेल्वेच्या आकाश पांडे आणि अयान चौधरी यांनी प्रभावी गोलंदाजी केली. पांडेने 63 धावात 5 तर चौधरीने 39 धावात 4 गडी बाद केले. कर्नाटकाने रेल्वेवर पहिल्या डावात 19 धावांची नाममात्र आघाडी घेतली. 19 धावांनी पिछाडीवर असलेल्या रेल्वेने दुसऱ्या डावात बऱ्यापैकी फलंदाजी करत दिवसअखेर 62 षटकात 8 बाद 209 धावा जमवत कर्नाटकावर 190 धावांची आघाडी मिळवली. रेल्वेच्या दुसऱ्या डावात मोहमद कैफ 1 षटकार आणि 4 चौकारांसह 51 धावावर खेळत आहे. कर्णधार प्रथम सिंगने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 33, सुरज अहुजाने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 48, साहेब युवराज सिंगने 6 चौकारांसह 28 धावा जमवल्या. कर्नाटकातर्फे विशाखने 3, कविरप्पाने 2 तर कौशिक, समर्थ आणि हार्दिक राज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : रेल्वे प. डाव 155, कर्नाटक प. डाव 50.5 षटकात सर्वबाद 174 (समर्थ 22, निश्चल 20, अनिष 27, शरथ 24, विशाख 24, आकाश पांडे 5-63, चौधरी 4-39), रेल्वे दु. डाव 62 षटकात 8 बाद 209 (मोहमद कैफ खेळत आहे 51, अहुजा 48, प्रथम 33, विशाख 3-45, कविरप्पा 2-35).