रेल्वे मालवाहतूक 5 टक्क्यांनी वाढली

2023-24 या आर्थिक वर्षातील आकडेवारी सादर : कोळसा व लोहवाहतुकीचा टक्का अधिक वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  2023-24 या आर्थिक वर्षाची सुरुवात मंदावली असूनही, भारतीय रेल्वेची मालवाहतूक 5 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या तिमाहीत त्याला बळ मिळाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, रेल्वेने 2024 या आर्थिक वर्षात 1.59 अब्ज टन मालाची वाहतूक केली आहे. या वाढीत प्रामुख्याने कोळसा आणि […]

रेल्वे मालवाहतूक 5 टक्क्यांनी वाढली

2023-24 या आर्थिक वर्षातील आकडेवारी सादर : कोळसा व लोहवाहतुकीचा टक्का अधिक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 
2023-24 या आर्थिक वर्षाची सुरुवात मंदावली असूनही, भारतीय रेल्वेची मालवाहतूक 5 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या तिमाहीत त्याला बळ मिळाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, रेल्वेने 2024 या आर्थिक वर्षात 1.59 अब्ज टन मालाची वाहतूक केली आहे. या वाढीत प्रामुख्याने कोळसा आणि लोह धातूचा समावेश अधिक होता.
रेल्वेने एकूण 7,876.1 लाख टन कोळशाची वाहतूक केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 8 टक्के अधिक आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोहखनिजाची वाहतूक 1,809.5 लाख टन होती, जी 13 टक्के अधिक आहे. पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ललित चंद्र त्रिवेदी म्हणाले की, बहुतांश कोळशाची वाहतूक रेल्वेने केली जाते, कोळशाच्या उत्पादनात वाढ झाल्याचा फायदा झाला आहे. भारतात कोळशाचा वापर वाढत आहे आणि भविष्यात त्याच्या वाहतुकीमुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल.
तथापि, रेल्वेद्वारे विविध श्रेणीतील मालाची वाहतूक सुमारे 150 लाख टनांनी घटून 1,140 लाख टन झाली आहे. संकीर्ण श्रेणीत समाविष्ट केलेल्या मालाच्या वाहतुकीत दोन वर्षांच्या दुहेरी आकडेवाढीनंतर आता त्यांची वाहतूक कमी झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर रेल्वेला राष्ट्रीय लॉजिस्टिकमध्ये आपला वाटा वाढवण्याचे लक्ष्य गाठायचे असेल, तर देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाटा 1.2 ते 1.5 पटीने वाढवावा लागेल.