अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार द्या
जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिव मुरली मनोहर रेड्डी यांची सूचना
बेळगाव : सरकारी अंगणवाड्यांमध्ये विविध समस्या असून त्यांची पाहणी करून योग्य सूचना देण्याचे आदेश कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकारचे अध्यक्ष निवृत्त न्या. वेणुगोपाळ गौडा यांनी दिले. त्यानुसार जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी शहरातील तसेच ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना भेट देऊन पाहणी केली. त्या ठिकाणी अनेक त्रुटी आढळल्याने त्यांनी त्या दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत. बेळगाव येथील वीरभद्रनगरमधील अंगणवाडी क्र. 65 येथे त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी स्वयंपाक घर व स्टोअररुम अत्यंत लहान होती. स्वच्छतागृह आणि पाण्याची सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे मुरली मनोहर रेड्डी यांनी सदर अंगणवाडी दुसऱ्या जागेत स्थलांतरित करावी, अशी सूचना सीडीपीओंना केली.
ग्रामीण भागातील हंगरगा येथील अंगणवाडीला भेट दिली असता विद्यार्थी इतर ठिकाणचे पाणी आणून पित होते. त्यामुळे पाण्याची सोय तातडीने करावी, असे ग्रामीण सीडीपीओंना त्यांनी सांगितले. मंडोळीतील अंगणवाड्यांना भेट दिली. त्या ठिकाणी वीजपुरवठा नसल्याने व स्वच्छतागृहही नाही. सदर अंगणवाडी ही छोट्या जागेमध्ये सुरू आहे. त्यामुळे तेथील अंगणवाडीचे स्थलांतर करावे, अशी सूचना त्यांनी ग्रामीण सीडीपीओंना केली. दरम्यान, या अंगणवाडीमध्ये सलग सहा दिवस उप्पीट दिले जाते. उप्पीटऐवजी अन्य पौष्टिक आहार देऊन तांदूळ उत्तम दर्जाचा वापरण्याची सूचना केली. चिक्कीचा दर्जा उत्तम होता. मात्र, इतर आहारात बदल करून लहान मुलांना पौष्टिक आहार उपलब्ध करा, असे त्यांनी सांगितले. सया साथीचे आजार फैलावत आहेत, तेव्हा लहान मुलांची जास्तीत जास्त काळजी घ्या, अशी सक्त ताकीद सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी केली आहे.
Home महत्वाची बातमी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार द्या
अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार द्या
जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिव मुरली मनोहर रेड्डी यांची सूचना बेळगाव : सरकारी अंगणवाड्यांमध्ये विविध समस्या असून त्यांची पाहणी करून योग्य सूचना देण्याचे आदेश कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकारचे अध्यक्ष निवृत्त न्या. वेणुगोपाळ गौडा यांनी दिले. त्यानुसार जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी शहरातील तसेच ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना भेट देऊन पाहणी केली. त्या ठिकाणी अनेक त्रुटी आढळल्याने त्यांनी त्या दूर करण्याच्या […]