शहराच्या काही भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय

अलारवाड पंपहाऊसचा वीजपुरवठा ठप्पमुळे समस्या बेळगाव : अलारवाड पंपहाऊस येथील वीजपुरवठा अचानक ठप्प करण्यात आल्याने पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. परिणामी दि. 25 आणि 26 जुलै रोजी शहराला अंशत: पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या व्यत्ययामुळे प्रामुख्याने अलारवाड, बसवन कुडची, देवराज अर्स कॉलनी येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मीटेकडी येथे हेस्कॉमतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय […]

शहराच्या काही भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय

अलारवाड पंपहाऊसचा वीजपुरवठा ठप्पमुळे समस्या
बेळगाव : अलारवाड पंपहाऊस येथील वीजपुरवठा अचानक ठप्प करण्यात आल्याने पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. परिणामी दि. 25 आणि 26 जुलै रोजी शहराला अंशत: पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या व्यत्ययामुळे प्रामुख्याने अलारवाड, बसवन कुडची, देवराज अर्स कॉलनी येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मीटेकडी येथे हेस्कॉमतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. वीजपुरवठा नसल्याने पाणी शुद्धीकरण प्रक्रियेमध्येही अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी विनायकनगर, स्कीम नं. 51, सैनिकनगर, केएचबी कॉलनी, मराठा कॉलनी, जयनगर, ओंकारनगर, सिंधी कॉलनी, सह्याद्रीनगरचा काही भाग व हिंडलगा पंचायतीच्या कक्षेतील वसाहतींना पाणीपुरवठा करण्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे, असे स्पष्टीकरण एलअॅण्डटीने पत्रकाद्वारे दिले आहे.