अदानी समूहाच्या ‘कच्छ कॉपर’चे उत्पादन सुरु

दरवर्षी 10 लाख टन तांबे उत्पादन करणार : 7 हजार लोकांना रोजगाराच्या संधी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मुंद्रा येथील ग्रीनफिल्ड कॉपर रिफायनरी प्रकल्पात अदानी समूहाच्या ‘कच्छ कॉपर’ कंपनीने उत्पादन सुरू केले आहे. कंपनीने या रिफायनरीतून कॅथोडची पहिली बॅचही ग्राहकांना पाठवली आहे. यासह समूहाने धातू उद्योगातही पहिले पाऊल टाकले आहे. अदानी समूहाने या प्लांटमध्ये 1.2 अब्ज डॉलर्स […]

अदानी समूहाच्या ‘कच्छ कॉपर’चे उत्पादन सुरु

दरवर्षी 10 लाख टन तांबे उत्पादन करणार : 7 हजार लोकांना रोजगाराच्या संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुंद्रा येथील ग्रीनफिल्ड कॉपर रिफायनरी प्रकल्पात अदानी समूहाच्या ‘कच्छ कॉपर’ कंपनीने उत्पादन सुरू केले आहे. कंपनीने या रिफायनरीतून कॅथोडची पहिली बॅचही ग्राहकांना पाठवली आहे. यासह समूहाने धातू उद्योगातही पहिले पाऊल टाकले आहे.
अदानी समूहाने या प्लांटमध्ये 1.2 अब्ज डॉलर्स (सुमारे 10,008 कोटी रुपये) गुंतवले आहेत. हा तांबे स्मेल्टिंग प्लांट दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे, ज्याच्या पहिल्या टप्प्यात वार्षिक 5 लाख टन तांबे उत्पादन होणार आहे. एकाच ठिकाणी असलेले जगातील सर्वात मोठे मेटल स्मेल्टर दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात त्याच क्षमतेचा दुसरा प्लांट (दरवर्षी 5 लाख टन) बांधण्यात येणार आहे.
याचा अर्थ, एकूण वार्षिक 1 दशलक्ष टन उत्पादनासह, हे एकाच ठिकाणी असलेले जगातील सर्वात मोठे धातूचे स्मेल्टर असेल. कंपनीने आज आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. कच्छ कॉपरने सांगितले की यामुळे 2,000 प्रत्यक्ष आणि 5,000 अप्रत्यक्ष नोकऱ्यांचे पर्याय खुले होणार आहेत.
90 टक्के तांबे आयात
भारत आपल्या गरजेपैकी 90 टक्के तांब्याची आयात करतो. तांब्याची उत्पादन क्षमता झपाट्याने वाढवून भारत चीन आणि इतर देशांच्या यादीत सामील झाला आहे. भारत आपल्या तांब्याच्या गरजेपैकी 90 टक्के दक्षिण अमेरिका आणि इतर अनेक देशांमधून आयात करतो. पायाभूत सुविधा आणि बांधकाम उद्योगात 40 टक्के तांब्याचा वापर केला जातो. तर 2023 मध्ये भारताने सुमारे 13 लाख टन तांबे बाहेरून खरेदी केले होते, यावर्षी ते 20 लाख टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
 तांब्याच्या नळ्याची निर्मिती
‘कच्छ कॉपर’ तांब्याच्या नळ्याच्या निर्मितीचे काम करत आहे. कंपनी कच्छ कॉपर ट्यूब लिमिटेड स्थापन करण्यावरही काम करत आहे. कंपनी येथून विद्युत उपकरणांसाठी तांब्याच्या नळ्या तयार करणार आहे. तांब्याच्या नळ्या रेफ्रिजरेटर्स, वाहने आणि बांधकाम कंपन्यांमध्ये वापरल्या जातात.
 
भारताचे आत्मनिर्भर भविष्याचे स्वप्न पूर्ण करू – गौतम अदानी
कच्छ कॉपरच्या ऑपरेशन्सच्या सुरुवातीबद्दल ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, ‘कच्छ कॉपरने काम सुरू केले आहे, आपल्या कंपन्या भारताचे मजबूत आणि आत्मनिर्भर भविष्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत.
आमची अंमलबजावणी आणि मोठ्या प्रकल्पांवर काम करण्याची क्षमता तांबे क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट आहे. 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल आणि हरित पायाभूत सुविधांचे स्वप्न पूर्ण करण्यात तांबे उद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे.