‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रमाचे मुख्य ‘यजमान’ पंतप्रधान नरेंद्र मोदीच !

वृत्तसंस्था / वाराणसी अयोध्येतील भव्य राममंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रमाचे मुख्य ‘यजमान’ पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील, अशी स्पष्ट घोषणा येथील ज्येष्ठ वैदिक कर्मकांड पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांनी केली आहे. आपण या कार्यक्रमाचे मुख्य आचार्यपद स्वीकारले आहे. या कार्यक्रमाचे पौरोहित्य आपण करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. या पवित्र आणि ऐतिहासिक […]

‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रमाचे मुख्य ‘यजमान’ पंतप्रधान नरेंद्र मोदीच !

वृत्तसंस्था / वाराणसी
अयोध्येतील भव्य राममंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रमाचे मुख्य ‘यजमान’ पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील, अशी स्पष्ट घोषणा येथील ज्येष्ठ वैदिक कर्मकांड पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांनी केली आहे. आपण या कार्यक्रमाचे मुख्य आचार्यपद स्वीकारले आहे. या कार्यक्रमाचे पौरोहित्य आपण करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पवित्र आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, समन्वयन आणि व्यवस्थापन काशीचे विद्वान पुरोहित गणेश्वर शास्त्री द्रवीड, 121 आचार्यांसह करणार आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या सर्व अनुष्ठानांना उपस्थित असणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समयाअभावी शक्य नसल्याने त्यांना इतर उपस्थित मान्यवर प्राणप्रतिष्ठा कार्यात साहाय्य करणार आहेत, अशीही माहिती दीक्षित यांनी दिली.
दीक्षितांचे वाराणसीहून निर्गमन
पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी मंगळवारी वाराणसीहून अयोध्येला जाण्यासाठी कारमधून निर्गमन केले होते. त्यानंतर काही तासांमध्येच ते अयोध्येला पोहचले. मंगळवारी त्यांनी त्यांच्या वाराणसीतील निवासस्थानातून प्रस्थान ठेवल्यानंतर सहस्रावधी उपस्थित लोकांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. वाराणसी दक्षिण मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार नीलकंठ तिवारी यांनी असंख्य लोकांसह त्यांना निरोप दिला. त्यानंतर ते गोलघर येथे पोहचले आणि नंतर त्यांनी कारने अयोध्येला निर्गमन केले. यावेळी उपस्थितांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देऊन, तसेच शंखनाद करुन परिसर दुमदुमून सोडला होता.