वीस वर्षांच्या जोडपे, लक्षावधींचे घर

वीस वर्षांच्या जोडपे, लक्षावधींचे घर

जगात कोठेही जा, आपले स्वत:चे घर बांधणे किंवा विकत घेणे, ही बाब कधीच सोपी नसते, असा अनेकांचा अनुभव आहे. विशेषत: आपल्या करिअरच्या प्रारंभीच, अगदी तरुण वयात घर घेणे जवळपास अशक्यच असते. कर्जांवर घरे किंवा सदनिका घेतल्या जातात, पण त्या खऱ्या अर्थाने आपल्या मालकीच्या नसतात. तसेच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वेतनातील निम्म्याहून अधिक रक्कम खर्च करावी लागते. त्यामुळे निदान 10-12 वर्षे नोकरी केल्याशिवाय घर घेण्याचा विचारही केला जात नाही. परंतु, तरुण वयातच अशी संधी मिळालेले काही भाग्यवान असतात. अशाच भाग्यवान जोडप्याची ही कथा आहे.
हॅना आणि चार्ली यांनी ते अनुक्रमे 20 आणि 21 वर्षांचे असताना एक मोठे घर स्वत: कमावलेल्या पैशांनी विकत घेतले होते. ते 70 वर्षे पूर्वीचे होते. तरी त्याची किंमत लक्षावधींच्या घरात होती. इतकेच नव्हे, तर साधारणत: 10 वर्षांपूर्वी घेतलेले हे घर त्यांनी अगदी नव्यासारखेही केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या या उपलब्धीची माहिती सोशल मिडियावर टाकली. आता लोक त्यांच्या भाग्याचा हेवा करीत आहेत. इतक्या लहान वयात स्वत:च्या कमाईवर त्यांनी हे घर कसे घेतले याची आता चर्चा होत आहे. या दोघांना वेतन चांगले मिळते. तसेच कामाच्या व्यतिरिक्त ते इतर छोटी मोठी कामे करुन पैसा मिळवित होते. सातत्याने काम करुन आणि मोठ्या प्रमाणात काटकसर करुन त्यांनी प्रथम जुने मोठे घर विकत घेतले आणि नंतर त्याचे नूतनीकरण केले. आता हा चर्चेचा विषय बनला आहे.