प्रज्ञानंदचा कार्लसनवर पहिला ‘क्लासिकल’ विजय

वृत्तसंस्था /स्टॅव्हेंजर (नॉर्वे) भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा क्लासिकल प्रकारात प्रथमच पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत एकट्याने आघाडी मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. खेळाच्या ऑनलाईन आणि वेगवान आवृत्त्यांमध्ये प्रज्ञानंदने काही वेळा कार्लसनला पराभूत केलेले आहे. पण गेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याच्याकडून पराभूत झाल्यानंतर, प्रज्ञानंदने अखेरीस नॉर्वेच्या या आवडत्या […]

प्रज्ञानंदचा कार्लसनवर पहिला ‘क्लासिकल’ विजय

वृत्तसंस्था /स्टॅव्हेंजर (नॉर्वे)
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा क्लासिकल प्रकारात प्रथमच पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत एकट्याने आघाडी मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. खेळाच्या ऑनलाईन आणि वेगवान आवृत्त्यांमध्ये प्रज्ञानंदने काही वेळा कार्लसनला पराभूत केलेले आहे. पण गेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याच्याकडून पराभूत झाल्यानंतर, प्रज्ञानंदने अखेरीस नॉर्वेच्या या आवडत्या खेळाडूवर विजय मिळवला आहे.  तिसऱ्या फेरीतील विजयानंतर 18 वर्षीय भारतीय खेळाडू पुऊष गटात एकूण 5.5 गुणांसह आघाडीवर आहे, अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाच्या तुलनेत त्याचा अर्धा गुण जास्त आहे. कारुआनाने विद्यमान विश्वविजेत्या चीनच्या डिंग लिरेनविऊद्ध क्लासिकल बुद्धिबळमधील पहिला विजय मिळवला. कार्लसन, तीन गुणांसह सुधारित क्रमवारीत सध्या तिसऱ्या स्थानावर दिसत आहे, परंतु प्रत्येक क्लासिकल विजयासह तीन गुण मिळत असल्याने हे चित्र कदाचित जास्त काळ टिकणार नाही.
अमेरिकेचा हिकारू नाकामुरा, फ्रान्सचा फिरोजा अलिरेझा आणि लिरेन हे सर्व संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. सध्या सहा खेळाडूंच्या दुहेरी राऊंड-रॉबिन स्पर्धेत त्यांचे 2.5 गुण आहेत. माझी इच्छा आहे की, मॅग्नसने आमच्यासारख्या जुन्या खेळाडूंविरुद्ध अशीच जोखीम पत्करावी, असे नाकामुराने कार्लसनच्या प्रज्ञानंदविरुद्ध जोखीम घेऊन खेळण्याच्या पद्धतीबद्दल बोलताना सांगितले. क्लासिकल बुद्धिबळ, ज्याला स्लो चेस देखील म्हटले जाते, त्यात खेळाडूंना त्यांच्या चाली खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. कार्लसन आणि प्रज्ञानंदने त्यांचे या प्रकारातील मागील तीन सामने अनिर्णित ठेवले होते. महिलांच्या स्पर्धेत प्रज्ञानंदची मोठी बहीण आर. वैशालीने क्लासिकल प्रकारात बरोबरी साधल्यानंतर आर्मागेडॉन गेममध्ये नॉर्वेच्या अॅना मुझिचूकला मागे टाकून आपली आघाडी कायम राखली. वैशालीने देखील 5.5 गुणांपर्यंत मजल मारली आहे आणि महिला विश्वविजेती चीनच्या वेनजुन जूवर पूर्ण गुणाची आघाडी मिळवली आहे. वेनजुन चीनच्या टिंगजी लेईपेक्षा अर्ध्या गुणांच्या फरकाने पुढे असून दुसऱ्या स्थानावर आहे.