प्रज्ञानंद कारुआनाला नमवून जगातील पहिल्या 10 खेळाडूंत
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंगर, नॉर्वे
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनावर जबरदस्त विजय मिळवत येथील नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीच्या समाप्तीनंतर जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे, अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने चीनचा वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेनला नमवत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनवरील आघाडी वाढविली.
10 गुणांसह नाकामुराने या 1 लाख 61 हजार अमेरिकी डॉलर्स इतकी बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेच्या अर्ध्या टप्प्यावर कार्लसनवर पूर्ण गुणाची आघाडी घेतली आहे. कार्लसनने फ्रान्सच्या फिरोजा अलिरेझाला पराभूत केले. अजून पाच फेऱ्या बाकी असताना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लसनच्या पाठोपाठ प्रज्ञानंद आहे (8.5), तर चौथ्या स्थानावर असलेल्या अलिरेझाचे पराभव स्वीकारावा लागल्याने 6.5 गुण कायम आहेत. काऊआना पाचव्या स्थानावर आहे, तर डिंग लिरेनचे केवळ 2.5 गुण झालेले असून त्याला स्पर्धेचा आनंद लुटता आलेला नाही.
महिलांच्या स्पर्धेत आर. वैशालीने तिची स्वप्नवत वाटचाल सुरू ठेवली असून चीनच्या टिंगकी लेई हिला आर्मागेडन गेममध्ये पराभूत करून 10 गुणांनिशी आघाडी कायम ठेवली आहे. बाकीच्या खेळाडूंपैकी अॅना मुझीचूक तिला सर्वांत जवळ असून क्लासिकल गेममध्ये स्वीडनच्या पिया क्रॅमलिंगला पराभूत केल्यानंतर ती एका गुणाने वैशालीच्या मागे आहे.
कोनेरू हम्पीवर आर्मागेडनमध्ये सलग पाचवा विजय मिळवून महिला विश्वविजेती वेनजून जू 7.5 गुणांनिशी तिसऱ्या स्थानावर आहे. लेई सहा गुणांसह चौथ्या स्थानावर असून संघर्ष करत असलेल्या हम्पीपेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. तीन गुणांसह क्रॅमलिंग गुणतालिकेच्या तळाशी आहे.
Home महत्वाची बातमी प्रज्ञानंद कारुआनाला नमवून जगातील पहिल्या 10 खेळाडूंत
प्रज्ञानंद कारुआनाला नमवून जगातील पहिल्या 10 खेळाडूंत
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंगर, नॉर्वे भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनावर जबरदस्त विजय मिळवत येथील नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीच्या समाप्तीनंतर जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे, अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने चीनचा वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेनला नमवत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनवरील आघाडी वाढविली. 10 गुणांसह नाकामुराने या 1 लाख 61 हजार […]