पोर्तुगालने क्रोएशियाचा 2-1 ने पराभव केला,रोनाल्डोने विक्रमी 900 वा गोल करत व्यावसायिक फुटबॉलमध्ये इतिहास रचला
रोनाल्डोने एस्टाडिओ दा लुझ येथे खेळल्या गेलेल्या सामन्याच्या 34व्या मिनिटाला नुनो मेंडेसच्या क्रॉसवरून गोल करत व्यावसायिक फुटबॉलमध्ये इतिहास रचला.रोनाल्डोने कारकिर्दीतील विक्रमी 900 वा गोल केला .पोर्तुगालने क्रोएशियाचा 2-1 ने पराभव केला.काही दिवसांपूर्वी रोनाल्डोने सौदी अरेबियातील अल-नसर क्लबसाठी शानदार फ्री-किक मारून हा पराक्रम गाठला होता.
सौदी अरेबियात क्लब फुटबॉल खेळणाऱ्या रोनाल्डोने एस्टाडिओ दा लुझ येथे खेळल्या गेलेल्या सामन्याच्या 34व्या मिनिटाला नुनो मेंडेसच्या क्रॉसवरून गोल करत व्यावसायिक फुटबॉलमध्ये इतिहास रचला. पोर्तुगालच्या जर्सीतील हा त्याचा 131वा गोल ठरला. गोल साजरा करताना रोनाल्डो भावूक दिसला.
रोनाल्डो हा जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. रोनाल्डोची क्लब कारकीर्द उत्कृष्ट आहे. रोनाल्डो हा आधीपासूनच व्यावसायिक फुटबॉल आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आघाडीचा गोल करणारा खेळाडू आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मेस्सी आहे,त्याने आपल्या कारकिर्दीत 838 गोल केले आहे.
Edited by – Priya Dixit