महाराष्ट्रसह देशात पावसाचा जोर कायम, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने आज दिल्ली-NCR सोबत 18 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट घोषित केला आहे. जेव्हा की, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये भीषण वादळाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दिल्ली मध्ये आज आणि …

महाराष्ट्रसह देशात पावसाचा जोर कायम, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

देशात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. जरी 8 सप्टेंबरला मान्सून कमी होण्याचे संकेत मिळत आहे तरी उत्तर भारतात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. 

 

हवामान खात्याने आज दिल्ली-NCR सोबत 18 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट घोषित केला आहे. जेव्हा की, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये भीषण वादळाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दिल्ली मध्ये आज आणि उद्या यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.  

 

आज दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, आसाम, उत्तराखंड, छत्तीसगढ़, झारखंडआणि महाराष्ट्र सॊबत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source