पोखरबाव गणेश मंदिर दाभोळे
महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्रे आहे. तसेच महाराष्ट्राला अतिशय प्राचीन मंदिरांच्या इतिहासाचा वारसा देखील लाभलेला आहे. तसेच विज्ञान युगात मानवाने खूप प्रगती केली आहे. त्याबरोबर प्राचीन मंदिरांसोबत आता नवीन बांधलेलं मंदिर आपल्या सौंदर्याने अनेक पर्यटकांना आकर्षित करतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात मंदिरे आहे. तसेच त्या मंदिरांना आख्यायिका देखील आहेत. काही मंदिरे प्रचीन असून देखील भक्कमपणे उभे आहे तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नैसर्गिक पर्यटनाचा अनमोल ठेवा लाभलेला आहे. तसेच आज आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्राचे प्रसिद्ध पर्यटन कोकण. तसेच आता या वर्षी सात सप्टेंबरला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. अनेक लोक गणेश उत्सव दरम्यान ठिकठिकणांच्या गणपतींचे दर्शन घेतात.
इतिहास –
तसेच कोकण मध्ये असलेले पोखरबाव गणेश मंदिर हे अतिशय सुंदर मंदिर आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर दरवर्षी अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पोखरबाव गणेश मंदिर हे दाभोळे गावापासून अवघ्या 2 किमी अंतरावर स्थापित आहे. तसेच या मंदिराच्या बाजूला पाण्याचा जिवंत झरा हा सतत वाहत असतो. तसेच या मंदिराच्या शेजारीच एक भाला मोठा डोंगर आहे. व त्या डोंगरात एक छिद्र आहे. व हा जिवंत झरा या डोंगराच्या खालूनच वाहतो. तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, हा डोंगर नैसर्गिकरित्या पोखरला गेला होता. व यातूनच पाण्याचा झरा वाहू लागला. या पोखरलेल्या डोंगरच्या पायथ्याशी असलेले सुंदर असे टुमदार गणपती बाप्पांचे मंदिर पोखरबाव गणेश मंदिर म्हणून सर्वदूर प्रसिद्ध झाले. हे मंदिर श्री गणेश यांना समर्पित आहे. तसेच आसनावर स्थापित ही श्री गणेशांची मूर्ती काळ्या पाषाणाची असून बाजूला वाहन उंदीराची सुंदर मूर्ती देखील आहे. हे मंदिर तेथील स्थानीय नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात गणेशउत्सव साजरा करण्यात येतो. तसेच या मंदिराला फुले, पताका, लाइटिंग याने सजवण्यात येते. गणपती बापांना मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. महाआरती होते. गणेशउत्सवाचा दहा दिवसात अनेक भक्त इथे दर्शन घ्यायला येतात. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर जागृत देवस्थानांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तसेच या मंदिरात भगवान शंकरांची देखील शिवलिंग आहे. तसेच अशी आख्यायिका आहे की, ही महादेवांची शिवलिंग अनेक वर्षांपासून पाण्याखाली होती. नंतर तेथील पुजारींना स्वप्नात दृष्टांत झाल्यानंतर ही शिवलिंग पाण्यामधून बाहेर काढून तिची स्थापना करण्यात आली.
पोखरबाव गणेश मंदिर दाभोळे जावे कसे?
देवगड पासून 13 किमी अंतरावर असलेल्या पोखरबाव गणेश मंदिरात जाण्यासाठी तुम्ही देवगड वरून खाजगी वाहन ने जाऊ शकतात. तसेच दाभोळे गावापासून 2 किमी अंतरावर हे मंदिर आहे. येथून सुद्धा खाजगी वाहन किंवा रिक्षा, टॅक्सी ने तुम्ही मंदिरापर्यंत पोहचू शकतात.